मुंबई, 25 नोव्हेंबर : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते, कारण काहीही असो! प्रियांका चोप्रा नुकतीच तिच्या मायदेशी केसांची निगा राखण्यासाठीतिचा हेयरकेअर ब्रँड लॉन्च करण्यासाठी भारतात आली होती. इथे आल्यावर तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. ज्या आता चर्चेचा विषय ठरत आहेत. भारताच्या दौऱ्यावर असताना प्रियांका ‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट मध्ये सहभागी झाली होती. इथे तिने तिच्या करियर आणि खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने तिच्या करियर बाबत केलेलं वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोक आपल्या करियरला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा धक्कादायक खुलासा प्रियंकाने यावेळी केला आहे. प्रियंकाने तिच्या ब्रँडच्या प्रमोशनदरम्यान आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणाने खुलासे केले आहेत. या मुलाखतीत बोलताना प्रियांका म्हणाली कि, ‘‘माझ्या आजूबाजूला असे लोक आहेत ज्यांना माझे करिअर धोक्यात घालायचे आहे. त्यांना मला कामापासून दूर करायचे आहे. मी जे काही करत होते त्यामुळे मला कास्ट केले जात नव्हते. चांगले काम करत होते." हेही वाचा - Vikram gokhale यांच्या प्रकृतीत सुधारणा; डोळे उघडले असून लवकरच व्हेंटिलेटरवरुन काढणार ती पुढे म्हणाली कि, “पण मला काम करण्यापासून या लोकांनी केलेला विरोध थांबवू शकत नाही. मी काहीही न करता बसून राहू शकत नाही. कदाचित मी एक रात्र रडेन, पण दुसऱ्या दिवशी मी गप्प बसणार नाही. तुम्हाला विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देणं थांबवावे लागेल. त्या व्यक्तीकडे लक्ष द्या जो तुमच्यावर विश्वास ठेवतो.’’
प्रियांका चोप्राला असेही वाटते की केवळ काही लोकच इतरांच्या यशाचा आनंद साजरा करू शकतात आणि त्यामधेय भारतात राहणाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी ती तिने ‘भूताची पूजा’ केल्याच्या अफवाही फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, वर्क फ्रंटवर, प्रियांका ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘सिटाडेल’ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रुसो ब्रदर्स निर्मित, `सिटाडेल` प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. आगामी साय-फाय ड्रामा सिरीजचे दिग्दर्शन पॅट्रिक मॉर्गन करत आहेत आणि प्रियांकासोबत रिचर्ड मॅडन हे कलाकार आहेत. बॉलीवूडमध्ये, ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत काम करणार आहे. फरहान अख्तर ‘डॉन 2’ नंतर दिग्दर्शकाच्या भूमिकेत परतला आहे. ‘जी ले जरा’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून हा सिनेमा 2023 च्या उन्हाळ्यात रिलीजसाठी सज्ज होईल.