स्वतंत्र दिनाला अभिनेत्री ईशा गुप्तानं केलं 'हे' ट्वीट, नेटकरी म्हणाले...

स्वतंत्र दिनाला अभिनेत्री ईशा गुप्तानं केलं 'हे' ट्वीट, नेटकरी म्हणाले...

स्वतंत्र दिनाला शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या या ट्वीटमुळे ईशाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी हॉट तर कधी टॉपलेस फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरणारी ईशा आता मात्र एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. ‘जन्नत 2’ ‘रुस्तम’ ‘कमांडो 2’ ‘बादशाहो’ यासारख्या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री नुकतीच स्वतंत्र दिनाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यानं ईशाची सर्वत्र चर्चा होत आहे. चुकीच्या ट्वीटमुळे ईशाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आज स्वतंत्र दिनाला ईशानं सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र तिनं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ‘गणतंत्र दिन की शुभकामनाए’ असं लिहिलं होतं. म्हणजेच ईशानं स्वतंत्र दिनाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असं म्हटल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

VIRAL VIDEO : हॅलो! अक्षय कुमारनं उचलला पत्रकाराचा फोन आणि...

त्यानंतर ईशाच्या अकाउंटवरून काही विचित्र ट्वीट पाहायला मिळाले. एका ट्वीट तिनं लिहिलं, आज चांगला दिवस आहे. तर आणखी एका ट्वीमध्ये तिनं युजरला त्याचा नंबर सेन्ड करायला सांगितला.

याड लागलं! भूमि पेडणेकर बॉलिवूडच्या या हिरोला करतेय डेट?

काही वेळानं ईशानं पुन्हा एक ट्वीट करत तिचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगितलं. तिनं लिहिलं, ‘माझं अकाउंट हॅक झालं असून यावरील कोणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका किंवा मेसेजही करू नका.’

ईशाच्या प्रजासत्ता दिनाच्या ट्वीटमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. एका युजरनं लिहिलं. अजूनपर्यत रात्रीची धुंदी उतरली नाही असं दिसतंय. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं यापेक्षा तु विश केलं नसतं तर बरं झालं असतं. तर काही युजर्सनी तिला अशा चुकीच्या ट्वीटमुळे चक्क वेड्यातही काढलं.

'या' स्टार सेलिब्रिटींची भावंडं दिसतात त्यांच्यापेक्षाही सुंदर! पाहा PHOTO

ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. ती नेहमीच बिकिनी आणि टॉपलेस फोटो शेअर करत असते. ईशा गुप्ता 2007 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल बनली होती. त्यानंतर तिनं मॉडेलिंग आणि मग बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी ती अक्षय कुमारच्या ‘टोटल धमाल’मध्ये दिसली होती.

==============================================================

SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी

First published: August 15, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading