जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर

रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर

रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतचा एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघेजण रोल्ड सिगार ओढताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत  मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) ड्रग अँगल समोर आल्याने हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. दरम्यान यामध्ये मुख्य आरोपपत्र असाणारी अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला  (Rhea Chakraborty) एनसीबीने अटक केली आहे. तिने केलेला दुसरा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणात नारकोटिक्‍स कंट्रोल ब्‍यूरो (NCB) चा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशा विविध गोष्टी समोर येत आहेत. नुकताच रिया आणि सुशांतचा एक अनसीन व्हिडीओ (Unseen Video) समोर आला आहे. यामध्ये दोघेजण रोल्ड सिगार ओढताना दिसत आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या अटकेआधी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की तिने कधी ड्रग्ज घेतले नाहीत, पण सुशांत ड्रग घ्यायचा. मात्र हा व्हि़डीओ समोर आल्यानंतर रियाची पोलखोल झाली आहे. रियाच्या अटकेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये रिया सुशांतला ‘I Love You’ म्हणते तेव्हा उत्तरादाखल सुशांत तिला ‘I Hope So..’ म्हणतो. (हे वाचा- रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांतच्या डॅग्ज पार्टीचा खुलासा )

जाहिरात

Zee News ने यासंदर्भात व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या रिपोर्टनुसार जारी केलेल्या या व्हि़डीओमध्ये सुशांत एक भक्ती गीत म्हणत आहे आणि  तो नशेमध्ये असल्याचे वाटत आहे. व्हिडीओमध्ये त्याचे फ्लॅटमेट सॅम्युअल आणि सिद्धार्थ पिठानी देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक माणूस विचारतो आहे की हे चरस आहे का? सुशांत त्यावेळी गंमतीत म्हणतो की हे व्हीएफएक्स आहे. तर रिया म्हणते की ही रोल सिगरेट आहे. यानंतर हा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती म्हणते की ही हर्बल स्टीक आहे, त्यानंतप पुन्हा एकदा सुशांत ते व्हीएफएक्स म्हटल्याचं सांगतो. (हे वाचा- अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, अवघ्या 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास) रियाने तिच्या जामिन याचिकेमध्ये कोर्टात असे म्हटले होते की, एनसीबीने तीचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता आणि या चौकशीदरम्यान कोणतीही महिला अधिकारी उपस्थित नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात