प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, अवघ्या 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, अवघ्या 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) याचे आज पहाटे निधन झाले.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) याचे आज पहाटे निधन झाले. दीर्घकाळापासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी सामना करत होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे आदित्यची प्राणज्योत मालवली. अवघ्या 35 व्या वर्षी आदित्य पौडवाल याचे निधन झाले आहे. आदित्यच्या अशा जाण्याने पौडवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अत्यंत दु:खदायक ठरले आहे. आदित्यच्या जाण्याने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. एवढ्या कमी वयात त्याने जगाला अलविदा केल्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो किडनीच्या आजाराशी लढत होता.अनुराधा पौडवाल यांच्या प्रमाणेच आदित्यला देखील संगीतामध्ये आवड होती. आदित्य पौडवाल एक म्यूझिक कंपोझर होता.

(हे वाचा-कुशल बद्रिके झाला भावूक, ठाणे पालिकेला केली कळकळीची विनंती, पाहा हा VIDEO)

आदित्यने देखील त्याच्या आईप्रमाणे काही भजनं गायली आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला देखील त्याने असे सांगितले होते की, तो भक्ति संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आखत आहे. त्याचे नाव भारतातील सर्वात तरूण संगीत दिग्दर्शक म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये देखील समाविष्ट आहे.

यावर्षात मनोरंजन विश्वातील अनेकांनी या जगाचा निरोप घेतला आहे. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, सरोज खान, निशिकांत कामत, राहत इंदौरी, कुमकुम, मेहमुद, रजत मुखर्जी यांसारख्या विविध क्षेत्रातील कलाकारांनी जगास अलविदा केले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 12, 2020, 11:17 AM IST

ताज्या बातम्या