• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांत कुठे करायचा डॅग्ज पार्टी याचाही खुलासा

रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं, सुशांत कुठे करायचा डॅग्ज पार्टी याचाही खुलासा

रियाच्या कबुलीनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे. कारण यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्ती हिने NCB समोर धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती समोर येत आहे. NCB ने CNN-NEWS18 ला दिलेल्या माहितीनुसार, रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत. तिचं विधान 16/2020 च्या प्रकरणात नोंदवलं गेलं आहे. रियाच्या कबुलीनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे. कारण यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा 67 अन्वये अंतर्गत आहेत. रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. लोणावळा इथल्या सुशांतच्या फार्म हाऊस बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांनी ड्रग पार्टी वापरला होता. तर या पार्टीमध्ये रियासुद्धा होती का? असा सवाल केला असता तिने आपण या पार्टीमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी रियाने 2 प्रसिद्ध पुरुष कलाकारांची नावंही NCB दिली आहेत. यामध्ये तिने काही छोट्या कलांकारांचीही नावं घेतली आहे. ज्यांचा आता NCB कडून कसून तपास होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना दरम्यान, या प्रकरणात रियाने एका फिल्ममेकरचंही नाव दिलं आहे. ज्याने सुरुवातीला सुशांतची सगळ्यांना ओळख करुन दिली आणि त्याला कोकेन आणि LSD पार्टीमध्ये नेलं. रियाचा असा दावा आहे की, सुशांतने तिला डेट करताना याबद्दल सांगितलं होतं. रियाने दिलेल्या संपूर्ण माहितीनंतर आता एनसीबी KJ नावाच्या माणसाचा शोध घेत आहे. तो लोणावळ्यातील सुशांतच्या फार्महाऊसमध्ये ड्रग्स सप्लाय करत होत. रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यामध्ये NCB ची रेड रियाने आपल्या 20 पानांच्या कबुली जबाबात असंही म्हटले आहे की, सुशांतला बायपोलर सिंड्रोम होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता NCB कडून शोध सुरू आहे. रियाने दिलेल्या माहितीवरून आज NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे. 2 दिवसाच्या पावसाने घरही पाण्याखाली आणि शेतही, बंधारा फुटल्याचे भीषण PHOTOS मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारी झालेल्या 5 ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता. इतकंच नाही तर चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं घेतली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झाली नसली तरी यातून मोठं रॅकेट समोर येणार असल्याचं दिसतं आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या 5 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये NCB पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
  Published by:Renuka Dhaybar
  First published: