रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यामध्ये NCB ची रेड

रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यामध्ये NCB ची रेड

गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपास मोठ्या वेगाने सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारी झालेल्या 5 ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता. इतकंच नाही तर चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं घेतली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झाली नसली तरी यातून मोठं रॅकेट समोर येणार असल्याचं दिसतं आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या 5 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये NCB पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना

खरंतर, रियाच्या अटकेनंतर NCB ची सगळ्यात मोठी कारवाई आहे. यामध्ये बॉलिवूड आणि ड्रग्ज असा मोठा सापळा उघड होणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता रियाच्या चौकशीनंतर अनेक बॉलिवूड स्टार्स हे NCB च्या रडारवर असणार आहेत. दरम्यान, या ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स विभागाला (NCB) मोठा साक्षीदार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीचा (rhea chakraborty) घरी ड्रग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दीपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला त्याने ओळखलं आहे.

पुढच्या 4-8 दिवसांत पुण्यात परिस्थिती बिघडू शकते, पालिकेकडून धक्कादायक खुलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिलमध्ये सुशांतच्या घरून रियाच्या घरी एक कुरिअर पाठवण्यात आलं होतं. दीपेश सावंतने हे कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये अर्धा किलो बड्स होते. लॉकडाऊनमध्ये चेकिंगदरम्यान बड्सचं पॅकेट पकडलं जाऊ नये, यासाठी कुरिअरमार्फत पॅकेट मागवण्यात आलं होतं, ज्यामध्ये घरातील काही सामानही ठेवण्यात आलं होतं.

सुशांतच्या घरून रियाच्या घरी कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने दीपेश आणि शोविकला ओळखलंदेखील आहे. शिवाय या कुरिअर बॉयचे फोन डिटेल्सही शोविक आणि दीपेशकडे सापडले आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 12, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या