राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणं भरून वाहिली आहेत तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. या फोटोंमधून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दोन दिवसाच्या पावासामुळे गावाची अवस्था झाली आहे. ही भीषण परिस्थिती मालेगावमधली आहे. सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील वळवाडे भागात असलेला कमलदरा बंधारा फुटला. बंधारा फुटल्यामुळे अनेक गावांत पाणी शिरलं आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे यामध्ये 4 म्हशी आणि 12 शेळ्याचा मृत्यू झाला आहे. जनावरांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या राहण्याची आणि खाण्याची गैरसोय झाली आहे.