मुंबई, 16 जानेवारी: भारतीय चित्रपटसृष्टीतील आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे जोडपं चांगलंच लोकप्रिय आहे. दोघांकडेही आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांच्या लग्नाला तब्बल 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. दोघांनी 2000 साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. आज दोघेही सुखी संसार करत आहेत. मात्र सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये रेणुका आणि आशुतोष एका लहान मुलासोबत दिसत आहेत. फोटो पाहताच मुलगा lत्यांचा नातू असल्याची बातमी पसरली. नेटकऱ्यांना विश्वास बसत नाही की हे तारे आजी-आजोबा झाले आहेत. हा फोटो चर्चेचा विषय का बनला आणि त्यामागील सत्य काय आहे आज जाणून घ्या. रेणुका शहाणे सोशल मीडियावर चांगल्या सक्रिय असतात. त्या इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने एक फोटो कोलाज शेअर केला होता. यामध्ये त्या आणि आशुतोष एका गोंडस मुलासोबत दिसत आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकरी संभ्रमात पडले आणि त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी आशुतोष आणि रेणुका यांचा नातू म्हणून मुलाने फोटो शेअर करायला सुरुवात केली. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karate: अनिरुद्धचा डाव यशस्वी होणार; अरुंधती आणि आशुतोष समोर उभं राहणार नवं आव्हान रेणुकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघींनी एका गोंडस बाळाला हातात घेतले आहे. दोघेही मुलासोबत खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोसोबत रेणुका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नवीन वर्ष 2023 ची सुरुवात जादुई पद्धतीने झाली, ज्यामध्ये आमचा नातू समदर्शन सहान माझ्यासोबत होता. आमच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल शाश्वत शहाणे आणि शैली यांचे आभार. कुटुंब सर्वकाही आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’’ हे कॅप्शन वाचून सर्वांना वाटले की हा आशुतोष आणि रेणुका यांचा नातू आहे. काही युजर्सला हे पाहून आश्चर्यही वाटले की रेणुका आणि आशुतोष इतक्या लवकर आजी आजोबा कसे झाले?
आशुतोष आणि रेणुका यांच्या कडेवर दिसणारा हा मुलगा त्यांच्या पुतण्या शाश्वतचा मुलगा आहे. नववर्षानिमित्त शाश्वत रेणुका-आशुतोष यांची पत्नी शैली आणि मुलगा समदर्शनसह भेटले. यादरम्यान समदर्शनसोबत दोघांचेही फोटो क्लिक करण्यात आले. शाश्वत त्याच्या मामासारखा दिसतो आणि अनेकदा आशुतोषसोबत त्याचे फोटो शेअर करत असतो.
रेणुका आणि आशुतोष यांचा विवाह २०० साली झाला होता. दोघांना शौर्यमान आणि सत्येंद्र अशी दोन मुले आहेत. दोघांच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर रेणुका शहाणे नुकत्याच ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटात झळकल्या होत्या तर आशुतोष येणाऱ्या काळात शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.