Home /News /entertainment /

‘बापरे! हा तर डेंजर झोन’ असं म्हणून पळत सुटल्या रेखा, पाहा VIDEO

‘बापरे! हा तर डेंजर झोन’ असं म्हणून पळत सुटल्या रेखा, पाहा VIDEO

अभिनेत्री रेखा यांचा या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात डेंजर झोन म्हणत रेखा पळताना दिसत आहे.

  मुंबई, 19 फेब्रुवारी : बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचं कॅलेंडर नुकतंच लॉन्च झालं. सोशल मीडियावर यंदाच्या या कॅलेंडर फोटोशूटचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. एकीकडे अभिनेत्री भूमि पेडणेकरनं या कॅलेंडरसाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटची चर्चा आहे. तर दुसरीकडे कियारा अडवाणीचाही या कॅलेंडरसाठी केलेला बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री रेखा यांचा या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात डेंजर झोन म्हणत रेखा पळताना दिसत आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं... डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी रेखा यांनीही फोटोशूट केलं आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लॉन्चिंग इव्हेंटला रेखा यांनी हजेरी लावली होती. यानंतर प्रेस फोटोशूटसाठी रेखा स्टेजवर आल्या पण त्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्याठिकाणी मागच्या बाजूला अमिताभ बच्चन यांच्या फोटो असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या बापरे हा तर डेंजर झोन असं म्हणून तिथून पळत सुटल्या. रेखा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डब्बू रत्नानीसाठी Topless झाली भूमि पेडणेकर, सोशल मीडियावर PHOTO VIRAL
  अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा आज इतक्या वर्षांनंतरही थांबायला तयार नाहीत. हे दोघंही कोणत्याही इव्हेंटमध्ये एकमेकांबद्दल बोलणं कटाक्षानं टाळताना दिसतात. इतकंच काय तर चुकीनं एखाद वेळी समोरासमोर आले तर रस्ता बदलून निघून जातात. मागच्या वर्षी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळीही असाच प्रकार घडला होता आणि त्यांचा व्हिडीओ त्यावेळीही व्हायरल झाला होता. शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक डब्बू रत्नानी कॅलेंडर लॉन्चमध्ये रेखा यांनी व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसल्या. यासोबत त्यांनी हेवी इअररिंग्स आणि ब्लक कलरचा गॉगल कॅरी केला होता. या संपूर्ण लुकमध्ये त्या नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत होत्या. डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरचे सर्व फोटो आता समोर आले आहेत. यात खास करुन कियारा अडवाणी, सनी लिओनी आणि भूमि पेडणेकर यांनी न्यूड फोटोशूट केल्यानं खूप चर्चेत आहेत. माधुरीच्या पहिल्या हिरोचं निधन, झाला होता 13 महिन्यांचा तुरुंगवास
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Rekha

  पुढील बातम्या