मुंबई, 19 फेब्रुवारी : बंगाली अभिनेता आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस पाल यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला आले होते मात्र कोलकाताला रवाना होत असताना एअपोर्टवर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यानंतर त्यांना जुहू येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं मात्र सकाळी त्यांनी प्राण सोडले.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार तापस पाल यांना याआधीही मागच्या वर्षी 2 वेळी हृदयविकाराच्या समस्येमुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी नंदीनी आणि मुलगी सोहिनी पॉल असा परिवार आहे.
‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहानं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद

तापस पाल यांनी 1984 मध्ये रिलीज झालेल्या अबोध या हिंदी सिनेमात माधुरी दीक्षितसोबत काम केलं होतं. या सिनेमातून माधुरीनं बॉलिवूड डेब्यू केला होता. आपल्या 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी सिने सृष्टीतील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं. त्यानंतर ते राजकारणाकडे वळले. 2016 मध्ये चिट फंड घोटाळा प्रकरणात तापस पॉल यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र 13 महिन्यांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
परिस्थिती भीतीदायक असतानाही लेकीला खळखळून हसवतोय बाप, मन हेलावणारा VIDEO
पश्चिम बंगालच्या चंद्रनगरमध्ये तापस यांचा जन्म झाला होता. त्यांनी हुगली मोहसिन कॉलेज मधून त्यांचं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं होतं. 1980 मध्ये त्यांनी तरुण मजुमदार यांच्या दादर किर्ती या बंगाली सिनेमातून डेब्यू केला होता. बंगाली सिनेमात 4 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये माधुरी दीक्षितसोबत ‘अबोध’ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला.
अमर सिंह यांची मृत्यूशी झुंज, अंथरुणाला खिळलेले असताना मागितली अमिताभ यांची माफी मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.