मुंबई, 19 फेब्रुवारी : अभिनेत्री भूमि पेडणेकर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर भूमिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिनं शेअर केलेली कोणतीही पोस्ट व्हायरल होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आताही भूमिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटोशूट तिनं डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी केलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी त्याच्या कॅलेंडरसाठी ओळखला जातो. दरवर्षी त्याच्या फोटोशूटची खूप चर्चा होते. डब्बू रत्नानीचं कॅलेंडर बऱ्याच अभिनेत्रींचं स्वप्न असतं. तसेच अनेक नवे कलाकार या कॅलेंडरसाठी फोटोशूट डेब्यू करतात. यंदा भूमिनं डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी डेब्यू केला आणि पदार्पणातच तिनं टॉपलेस फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. माधुरीच्या पहिल्या हिरोचं निधन, झाला होता 13 महिन्यांचा तुरुंगवास
भूमिनं तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भूमि बाथटबमध्ये टॉपलेस दिसत असून अशाप्रकारचं फोटोशूट करण्याची भूमिची ही पहिलीच वेळ आहे. या फोटोमध्ये भूमि खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री सनी लिओनीच्या फोटोचीही सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. बॉलिवूडचं क्यूट कपल ‘83’ सिनेमात एकत्र, दीपिकानं शेअर केला First Look
याशिवाय अनन्या पांडे, कियारा अडवाणी, विकी कौशल यांनीही डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं आहे. यंदा डब्बू रत्नानी त्याच्या कॅलेंडरची 25 वर्षं पूर्ण केली. त्यानिमित्त अनेक कलाकरांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर…’ नेहानं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद