जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rekha : 'एकदा नातं जोडलं गेलं की...' तब्बल 19 वर्षानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टच बोलली रेखा

Rekha : 'एकदा नातं जोडलं गेलं की...' तब्बल 19 वर्षानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टच बोलली रेखा

68 वर्षीय रेखाचं ग्लॅमरस फोटोशूट

68 वर्षीय रेखाचं ग्लॅमरस फोटोशूट

रेखाचे लग्न झालेले नाही, तरीही ती अभिमानाने सिंदूर लावते. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते. आता या अभिनेत्रीनं तब्बल 19 वर्षानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै : आपल्या ग्लॅमरस अवतार आणि सुंदर स्टाईलने नेहमीच चकित करणारी ही सदाबहार अभिनेत्री सध्या तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये 68 वर्षीय रेखा खूपच सुंदर दिसत आहे. मात्र या फोटोशूटमध्ये रेखाच्या भांगात भरलेल्या सिंदूराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेखाचे लग्न झालेले नाही, तरीही ती अभिमानाने सिंदूर लावते. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते. आता या अभिनेत्रीनं तब्बल 19 वर्षानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. एकदा रेखाचे अमिताभ बच्चनसोबत अफेअर होते, अशी माहिती आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चा चित्रपटसृष्टीत खूप रंगल्या होत्या. पण काही कारणांमुळे रेखा आणि अमिताभचे प्रेम यशस्वी ठरू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. मात्र विभक्त होऊनही रेखा यांच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम आहे. आता एवढ्या वर्षांनी इंटरनॅशनल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रेखाने प्रेमाविषयी खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर अपार प्रेम करता तेव्हा प्रेम संपते का? नाही. एकदा नातं जोडलं गेलं की ते कायम टिकतं. कधीकधी आपल्याला अधिक आवश्यक असते आणि कधीकधी ते पुरेसे असते. हे माझ्या कामाला लागू होते.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

याआधी देखील रेखाच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे.  2004 मध्ये जेव्हा रेखा सिमी गरेवालच्या चॅट शो रेंRendezvous with Simi Garewal मध्ये दिसली होती. तेव्हा अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. ही मुलाखत तीन भागात प्रसारित झाली. सिमी ग्रेवालने रेखाला तिच्या शोमध्ये ‘तू अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात आहेस का?’ असा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर देताना रेखा म्हणाली होती की, ‘होय. हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. मला अजून एकही पुरुष, स्त्री किंवा मूल भेटले नाही जे त्यांच्यावर प्रेम करत नाही. मग मी वेगळी का? मी त्यांच्यावरच प्रेम का नाकारू? अर्थातच मी त्यांच्यावर प्रेम करते.’ असा खुलासा तिने केला होता. एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप चित्रपटांमुळे संपलं असतं करिअर; 2023 मध्ये अभिनेत्यासोबत घडलं असं काही… रेखा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच एक रहस्य राहिले आहे. ज्या अभिनेत्रीवर सर्वांचेच प्रेम आहे ती आज अविवाहित आहे. अमिताभ बच्चन यांनी जयाशी लग्न केल्यानंतर 17 वर्षांनी रेखाने दिल्ली स्थित उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. मात्र लग्नाला चारच महिने उलटले असतानाच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून रेखा आजतागायत अविवाहित आहे आणि तिने पुन्हा लग्न केले नाही.

जाहिरात

असे असूनही रेखा नेहमी सिंदूर लावते. यावरही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न झाले तेव्हा रेखा भांगात सिंदूर भरून तेथे  पोहोचली. ती अमिताभच्या नावाने सिंदूर लावते अशी चर्चा होती. पण तसे नव्हते. 1982 मध्ये रेखाला ‘उमराव जान’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा अभिनेत्रीने सिंदूर लावण्याचे कारण सांगितले. अभिनेत्री म्हणाली की सिंदूर लावणे ही शहर आणि परिसरात फॅशनेबल मानली जाते. रेखाला मागणीनुसार सिंदूर लावायला आवडत असल्याने ती लावते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात