मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Raveena tandon: सलमान खान अन् करिश्मा कपूरसोबत कसं आहे रवीनाचं नातं? म्हणाली 'आमच्यात भांडणं व्हायची पण...'

Raveena tandon: सलमान खान अन् करिश्मा कपूरसोबत कसं आहे रवीनाचं नातं? म्हणाली 'आमच्यात भांडणं व्हायची पण...'

रवीना टंडन

रवीना टंडन

सलमान सोबत रवीनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण असं असलं तरी सलमान आणि रवीना त्यावेळी चांगले मित्र नव्हते. पण आता एवढ्या वर्षानंतर सलमान आणि रवीना मध्ये कसं नातं आहे याविषयीचा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे.

मुंबई, 25 मे : रवीना टंडनने 1991 मध्ये आलेल्या पत्थर के फूल या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सलमान खान तिचा पहिला सहकलाकार होता. सलमान सोबत रवीनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण असं असलं तरी सलमान आणि रवीना त्यावेळी चांगले मित्र नव्हते. दोघांचं फारसं पटत  नसायचं. एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची. त्यांच्यातलं नातं चांगलं नव्हतं. पण आता एवढ्या वर्षानंतर  सलमान आणि रवीना मध्ये कसं नातं आहे याविषयीचा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे.

रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सलमान आणि मी आज चांगले मित्र आहोत आणि आम्ही दोघंही कलाकार म्हणून मोठे झालो आहोत. दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. सलमानबद्दल बोलताना रवीना म्हणाली की, सलमान एक असा माणूस आणि मित्र आहे जो संकटाच्या वेळी कायम तुमच्यासोबत उभा असतो.' ती पुढे म्हणाली, 'तुमच्या सुखाच्या वेळी तो तुमच्यासोबत नसेल, पण तुमच्या वाईट काळात तो तुमच्यासोबत नक्कीच असेल.'

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना रवीना म्हणाली की, 'पूर्वी आम्ही तरुण होतो. त्यामुळे लहान मुलांप्रमाणे आमच्यात वर्गात भांडणे व्हायची. पण जसजसे आम्ही मोठे झालो, तसेतसे आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत आणि त्यासाठी एकमेकांचा आदर करायला शिकलो.'

VIDEO: सिक्युरिटी गार्डनं बाजूला ढकललं तर भाईजानने केलं इग्नोर; भर कार्यक्रमात विकी कौशलला मिळाली अशी वागणूक

रवीनाने करिश्मा कपूरसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले. राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटासाठी शूटिंग करताना दोघींमधल्या नात्याची फार चर्चा झाली होती. दोघींमधलं नातं फार चांगलं नव्हतं. एवढंच काय तर या दोघी एकमेकींशी बोलतही नव्हत्या. याविषयी बोलताना रवीना म्हणाली की, 'तुमचं सगळ्यांसोबतच जमत नाही ना? आज मला हे सांगायला आनंद होत आहे की करिश्मा आणि मी आज खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्यात छोटे छोटे गैरसमज होते. पण आज आमची मुलं एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आम्ही नेहमीच हँग आउटही करतो. त्यामुळेच आपण मोठे होतो असं मला वाटतं.' अशा भावना रवीना टंडनने व्यक्त केल्या आहेत.

रवीनाने आजवर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लग्न आणि मूल झाल्यानंतरसुद्धा अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेली नाही. आजही रवीना चित्रपटसृष्टीत चांगलीच कार्यरत आहे. तिच्या अभिनयावर आजही चाहते फिदा आहेत. येणाऱ्या काळात लवकरच ती 'गुलछडी' या चित्रपटात झळकणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Salman khan