मुंबई, 26 मार्च : सध्या देशभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण सापडले. आतापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आता त्यांच्या टीकाकारांनीही त्यांची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे. सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो… भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून ‘शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला’ असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. अशा आशयाची मराठी अभिनेते किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. ज्यात सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी वेगवान हालचाली, मुख्यमंत्री घेणार 4 हायप्रोफाईल बैठका
किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं… सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो… भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून ‘शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला’ असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते… अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो ! ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात. खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत ‘फॅक्च्यूअल डेटा’ देणं.. बोलताना ‘अनावश्यक पाल्हाळ’ आणि ‘डायलॉगबाजी’ टाळणं… खरंच चकीत होतोय रोज ! ‘लॉकडाऊन’चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही… तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. ‘टीझर-प्रोमो-जाहीराती-मार्केटिंग आणि मग पिच्चर’ अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला ! कालच ‘मास्क’चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं - विनाकारण बाहेर फिरणार्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं - माझं घर सातार्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी ‘एफिशियन्सी’ आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय. कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !!! धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे…मन:पूर्वक धन्यवाद ! - किरण माने. लॉकडाउनमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशनवर सोनाली म्हणते, ‘ही तर विडंबना आहे की…' बायकोला पाठीवर बसवून मिलिंद सोमणनं मारले पुशअप्स; म्हणाला, ‘तुम्ही असं काही…’