मुंबई, 16 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री रती अग्निहोत्री आजही खूपच सुंदर दिसते. हिंदी सहित तिने साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केलं. तीचा जन्म 10 डिसेंबर 1960 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. वडील प्रदेश अग्निहोत्री यांच्या नोकरीमुळे त्यांना बालपणी तामिळनाडूला स्थलांतरित व्हावे लागले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या रतीने वयाच्या 10 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिने 20 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण इथे तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात होती पण तिला ते प्रेम कधीच मिळालं नाही. तिचं वैयक्तिक आयुष्य खूपच दुःखी, कष्टी गेलं, जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या आयुष्याची गोष्ट…. वडिलांची नोकरी बदलल्यामुळे रतीच्या कुटुंबाला मद्रासला जावे लागले. येथेच तिचे शालेय शिक्षण झाले. शाळेतच तिने एका नाटकात भाग घेतला होता आणि प्रेक्षकांमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा होत्या. त्या त्यांच्या नवीन चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होत्या. यातच रतीची निवड झाली आणि वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिचा पहिला तमिळ चित्रपट पुधिया वरपुकल (1979) प्रदर्शित झाला. अवघ्या दोन वर्षांत, रतीने सुमारे 15 तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करून स्टारडम मिळवले. Ananya Pandey: बहिणीच्या लग्नात सिगारेट पिताना दिसली अनन्या; निशाणा साधत नेटकरी म्हणाले… 1981 मध्ये आलेला ‘एक दुजे के लिए’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सदाबहार चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातील कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांची प्रेमकथा आजही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटासाठी रतीला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीही नामांकन मिळाले होते. याच वर्षी संजय दत्तचा ‘रॉकी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संजय त्याच्या पहिल्याच चित्रपटातून स्टारही झाला होता.
संजय दत्तचे अफेअर अनेक अभिनेत्रींसोबत आहे. पण रती अग्निहोत्री त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. त्यावेळी ती फिल्मी करिअर सोडून ड्रग्जच्या व्यसनाने त्रस्त असलेल्या संजय दत्तसोबत लग्न करण्यास तयार होती. मात्र, तिचे वडील प्रदेश अग्निहोत्री यांना हे नाते मान्य नव्हते. ते संजयला रतीसाठी योग्य मुलगा मानत नव्हते. आपली मुलगी रतीला पटवण्यासाठी तिच्या वडिलांनी संजय दत्त नशेत असताना फोटोग्राफर्सना त्याचे फोटो काढण्यास सांगितले. यानंतर रतीच्या वडिलांनी अनेक फोटो एकत्र करून एक व्हिडिओ बनवला आणि आपल्या मुलीला दाखवला. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला संजयसोबत लग्न करण्यास सपशेल नकार दिला.
या घटनेनंतर काही दिवसांतच रतीच्या वडिलांना त्यांच्या मुलीसाठी योग्य मुलगा सापडला. रतीने बिझनेसमन अनिल विरवानी यांच्याशी अत्यंत साध्या सोहळ्यात लग्न केले. त्याला आधीच दोन वर्षांचा मुलगाही होता. मग लग्न आणि मुलामुळे रतीला अभिनयक्षेत्र कायमचं सोडावं लागलं. रती तिच्या वैवाहिक जीवनात कधीच आनंदी नव्हती. तिला 30 वर्ष मानसिक छळ आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. पती-पत्नीचे भांडण अगदी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. यानंतर 2015 मध्ये रती पती अनिलपासून विभक्त झाली. रतीला याबाबत विचारले असता, मुलावर वाईट परिणाम होऊ नये, म्हणून तिने लग्न वाचवल्याचे सांगितले होते.