बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिडच्या यादीत अनन्या पांडेचं नाव अग्रणी घेण्यात येतं. अनन्या पांडे चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत येते.
सध्या तिच्या बहिणीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच लग्नातील अनन्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच विवाहबद्ध होत आहे. या लग्नात अनन्या प्रत्येक सोहळ्यात जल्लोषात सामील झाली होती.
या कार्यक्रमाचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यातच अनन्या पांडेचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नुकतेच अनन्या पांडे लॅक्मे फॅशन वीकमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत रॅम्प वॉक करताना दिसली होती. त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं.
तिचा ग्लॅमरस अवतार तर पाहायला मिळालाच पण लोकांनी तिच्या केमिस्ट्रीचे कौतुकही केले. वर्क फ्रंटवर ती ड्रीमगर्ल 2 मध्ये दिसणार आहे.