जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rashmika-Vijay: लिव्ह-इनमध्ये राहतात रश्मिका आणि विजय? अखेर दोघांच्या नात्याचं सत्य आलं समोर

Rashmika-Vijay: लिव्ह-इनमध्ये राहतात रश्मिका आणि विजय? अखेर दोघांच्या नात्याचं सत्य आलं समोर

रश्मिका आणि विजय

रश्मिका आणि विजय

विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता रश्मिकाने दोघांच्या नात्यावर अखेर खुलासा केला आहे. दोघांविषयी तिने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07  एप्रिल:  अभिनेत्री रश्मिका मंदान्ना चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सोबत तिचं नाव कायमचं जोडलं जातं. दोघांनी आतापर्यंत ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात सोबत काम केलेलं आहे. दोन्ही चित्रपटांमधील त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ते अनेकदा सोबत फिरताना दिसले आहेत. त्यामुळे चाहते त्यांना ‘कपल’च समजत आहेत. दोघेही मुंबईमध्ये स्पॉट झाले होते. आता रश्मिकाने दोघांच्या नात्यावर अखेर खुलासा केला आहे. दोघांविषयी तिने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रश्मिका आणि विजयने या दोघांच्या नात्यावर अजून कधीच उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता अभिनेत्रीने अखेर मौन सोडलं आहे. रश्मिकाने गुरुवारी तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला होता, पण लोकांचे लक्ष त्या व्हिडिओच्या मागे असलेल्या गोष्टींकडे जास्त होते, कारण त्याच पार्श्वभूमीवर विजयचे अनेक फोटो आहेत. एवढेच नाही तर रश्मिकाच्या बोटातील अंगठी विजयची आवडती अंगठी असल्याचेही चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे दोघे लिव्ह-इनमध्ये असल्याचा दावाही चाहते करत आहेत. Salman Khan: धमकीचा इफेक्ट, सलमानने घेतली देशात कुणाकडे नसलेली कार, गोळी झाडली तरी काहीच होणार नाही! मात्र, आता रश्मिका मंदान्नाने विजय देवरकोंडासोबत अफेअर आणि लिव्ह-इनच्या बातम्यांवर मौन सोडलं आहे. या अफवांवर तिने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्ममने रश्मिका आणि विजयच्या नात्याबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यावरच प्रतिक्रिया देताना रश्मिका मंदान्नाने  ‘अय्यो… जास्त विचार करू नका बाबू’ असे मजेशीर ट्विट केले आहे.

जाहिरात

२७ वर्षीय रश्मिकाने तिच्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वाढदिवसादिवशी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ती सर्वांचे आभार मानताना दिसत आहे. ती म्हणते, ‘तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा दिवस खूप खास बनवला आहे… लवकरच तुमच्या भेटीला येत आहे… आशा आहे की तुम्ही सर्वजण आनंदात असाल आणि तुमचाही दिवस चांगला जावो.

News18लोकमत
News18लोकमत

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही दोन साऊथ इंडस्ट्रीमधील मोठी नवे आहेत. या दोघांनीही फारच कमी वेळात तुफान लोकप्रियता मिळाली आहे. या दोघांनी फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. रश्मिका आणि विजयची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडते. विजय आणि रश्मिका नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात