रश्मीका मंदाना साऊथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागच्या वर्षात आलेल्या 'पुष्पा' चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारत सगळ्यांनाच वेड लावले होते.
एवढंच नाही तर रश्मीकाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटात ती बिग बींच्या सोबत 'गुडबाय' या सिनेमात झळकली होती. तर नुकतीच ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मिशन मजनू' मध्ये देखील दिसली होती.
आता ही रश्मीका नुकतीच झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती. त्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.