'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

रश्मीने 'उतरन' मालिकेतील तिचा सहकारी नंदीश संधूशी 12 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै- 'उतरन' मालिकेतील तपस्या अर्थात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात रश्मीचं वजन फार वाढलेलं दिसतंय. याधीही रश्मीला वजन वाढल्यामुळे बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे आता तिने स्वतःच लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत केलं.

रश्मी गेल्या काही दिवसांपासून सोरायसिस या आजाराशी दोन हात करत आहे. याबद्दल तिने स्वतःच सांगितलं. शिवाय या आजारामुळे तिचं वजनही वाढलं आहे. डॉक्टरांनी तिला दिवसा घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. कारण उन्हात घराबाहेर रश्मी पडली तर या आजारात अजून वाढ होऊ शकते. याबद्दल सांगताना रश्मी म्हणाली की, ‘गेल्या काही दिवसांपासून मी आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरी जात आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात मला सोरायसिस असल्याचं कळलं. कोणताही आजार पूर्ण बरा होण्यासाठी काही काळ लागतो. असंही होतं की आजार पूर्ण बरा कधीच होत नाही. या आजारासाठीच मी स्टेरॉइड ट्रीटमेंट घेत होती.’

रश्मी पुढे म्हणाली की, ‘या आजारामुळे आणि त्यावरी औषध उपचारांमुळे माझं वजन प्रचंड वाढलं. मी यावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.’ रश्मीचा जन्म एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. तिला पहिल्यापासूनच मॉडेलिंगची आवड होती. दरम्यान, तिला भोजपुरी सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली.

रश्मीने टीव्ही करिअरमध्ये उतरनशिवाय श्श्श्श... फिर कोई है, इश्क का रंग सफेद, दिल से दिल तक, परी हूं मैसोबत नच बलिये आणि झलक दिखला जा या रिअलिटी शोमध्येही काम केलं आहे. रश्मीने उतरन मालिकेतील तिचा सहकारी नंदीश संधूशी 12 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल

जर मला तिकीट मिळालं नाही तर तुलाही देणार नाही, दोघीही नॉमिनेट होऊ- वीणा जगताप

World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 5:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading