राकेश आणि शमिता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. व्हिडीओमध्ये शमिता आणि राकेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Kajol Birthday : 'बाजीगर'ची प्रिया ते 'त्रिभंगा'ची अनुराधा; असा आहे काजोलचा फिल्मी प्रवास राकेश आणि शमिताच्या या म्यूझीक व्हिडीओचं नाव ‘तेरे विच रब दिसदा’ असं आहे. राकेश आणि शमिताच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. या व्हिडिओमधून या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी मिळतेय. त्यामुळे या दोघांचे चाहते सध्या खुश आहेत. शमिताने ब्रेकअप बद्दलच्या पोस्टमध्येच या म्युझिक व्हिडिओचा उल्लेख केला होता. तिनं चाहत्यांना या पोस्टमधून एक विनंती केली होती. ती म्हणाली होती कि, ' म्युझिक व्हिडीओ आम्ही खूप प्रेमाने आमच्या चाहत्यांसाठी बनवला आहे. या चाहत्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे. आम्ही आता वेगळं होत असलो तरी एक स्वतंत्र व्यक्ती चाहत्यांनी आमच्यावर प्रेम करावं' तसेच हा म्युझिक व्हिडीओ आमच्या सर्व चाहत्यांना समर्पित करते.' असं भावनिक आवाहन तिने चाहत्यांना केलं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News