प्रिया (बाजीगर) : केवळ शाहरुख खानच नाही, तर आपण काजोल आणि तिच्या 'काली काली आंखे' या या गाण्यावर थिरकलो आहोत.या चित्रपटात तिने तिच्या बहिणीच्या मारेकऱ्याच्या प्रेमात पडलेल्या मुलीची भूमिका साकारली होती.
सिमरन (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) : प्रचंड लोकप्रिय झालेल्या डीडीएलजे मधील सिमरनला कोण ओळखत नाही. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
ईशा (गुप्त) : ज्या वेळी बहुतेक आघाडीच्या नायिका आपलं फक्त प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसायच्या. त्या काळात काजोलने राजीव राय यांच्या 1997 च्या मर्डर मिस्ट्री, गुप्त: द हिडन ट्रुथ मधील मनोरुग्णाच्या भूमिकेने सगळ्यांची मने जिंकली.
नैना/सोनिया (दुष्मन) : मोठ्या पडद्यावरच्या तिच्या पहिल्या-वहिल्या दुहेरी भूमिकेत, काजोलने एक डॅशिंग मुलीची भूमिका निभावली. या चित्रपटात अभिनेत्रीला काही 'किक्स अँड ब्लो' देताना पाहणे मनोरंजक होते.
संजना (प्यार तो होना ही था) : प्यार तो होना ही था मध्ये काजोलच्चा विमानातील सीन पाहिल्यावर प्रेक्षक अजूनही पोट धरून हसतात. चार्टबस्टर गाणी आणि काजोल आणि अजय देवगनची आकर्षक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
अंजली (कुछ कुछ होता है) : करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है मधल्या अंजलीची म्हणजेच काजोलची एके काळी खूप हवा होती. तिने या चित्रपटात दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका साकारल्या. हि अजनली आजच्या तरुणाला देखील पाहावीशी वाटते.
अंजली (कभी खुशी कभी गम) : करण जोहरच्या कौटुंबिक मनोरंजन, कभी खुशी कभी गम मधील अंजली विक्षिप्त, तरीही प्रेमळ अंजली तर कमाल होती. तिचे या चित्रपटातील डायलॉग आजही लोकप्रिय आहेत.
झूनी (फना) : काजोलने आपल्या सर्वाना प्रभावित करून सोडले आहे तिच्या झूनी या दृष्टिहीन मुलीच्या भूमिकेने. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल दया दाखवण्याऐवजी, अभिनेत्रीने हे दाखवून दिले कि झूनी एक स्वतंत्र स्त्री आहे जी तिच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांना तोंड देण्यास तयार आहे.
मदिरा (माय नेम इज खान) : जर शाहरुख खान माय नेम इज खानचे हृदय असेल तर काजोल ही आत्मा आहे. एका सामान्य केशभूषाकारापासून ते एका तरुण आईपर्यंत जिने आपले मूल गमावले आणि आपल्या ऑटिस्टिक नवऱ्यासाठी आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेने तिच्या भरदार अभिनयाची अजून एक झलक पाहायला मिळाली.
अनुराधा (त्रिभंगा) : अनुराधा, ऍसिड-तीक्ष्ण जीभ असलेली एक वादग्रस्त बॉलीवूड अभिनेत्री म्हणून, काजोलने हे सिद्ध केले की रेणुका शहाणेच्या हिंदी दिग्दर्शनातील त्रिभंगा या चित्रपटात पडद्यावर फक्त प्रभाव टाकण्याशिवाय ती असाही अभिनय करू शकते.