मुंबई 24 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते तसेच दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांना कर्करोगाचं (Cancer) निदान झालं होतं. त्यानंतर नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मुंबईतील चर्नी रोड येथील एचएन रिलायन्स फाऊंडेशन या हॉस्पिटलमध्ये मांजरेकर यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर इथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या मांजरेकर यांना डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात येत आहे. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. दहा दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालात दाखल केलं होतं.
प्रकृती सुधारल्यानंतर मांजरेकर लगेचच ते कामावर रुजू होणार असल्याचंही समजतं आहे. ते सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मांजरेकरच या शोचं सुत्रसंचालन करणार असल्याचं चॅनलकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय हिंदीतही काही चित्रपटांवर ते काम करत आहेत. तब्येतीत सुधारणा होताच ते कामावर परतणार आहेत.
हातावर मेहंदी, कपाळावर मळवट, साजशृंगारात सजली ‘परम सुंदरी’; पाहा क्रितीचा मनमोहक Bride Lookईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मांजरेकर आता घरी आराम करत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगण्यात येत. मांजरेकर यांचा वाढदिवस 16 ऑगस्टला रुग्णालयातच साजरा करण्यात आला होता आणि त्याच दिवशी त्यांच्या ‘व्हाइट’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट ते संदीप सिंग आणि राज शांडिल्य यांच्यासोबत बनवत आहेत. महेश मांजरेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ याचीही घोषणा सावरकरांच्या 138 व्या जयंतीच्या दिवशी करण्यात आली होती.