• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कंगनाच्या 'सीता' चित्रपटात रणवीरची वर्णी; खिलजीनंतर आता साकारणार रावण

कंगनाच्या 'सीता' चित्रपटात रणवीरची वर्णी; खिलजीनंतर आता साकारणार रावण

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 • Share this:
  मुंबई 17 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) अलौकिक देसाई यांच्या द इनकारनेशन : सीता’ (The Incarnation : Sita) या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावं समोर येत होती. पण आता या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) काम करणार असल्याचं निश्चित झालं आहे. नुकतंच कंगनानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा केली. तर अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार द इनकारनेशन : सीता चित्रपटाचे निर्मात्यांनी रणवीरला लंकेश रावणाच्या भूमिकेसाठी विचारणा केली आहे. रणवीरला मे महिन्यातच ही ऑफर देण्यात आली होती. ज्यानंतर रणवीर आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्यातरी रणवीर चित्रपटाच्या फायनल नरेशनच्या प्रतीक्षेत आहे. रिपोर्ट्स नुसार रणवीर या चित्रपटाच्या भूमिकेसाठी फारच उत्सुक आहे. काही वृत्तानुसार सीता एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. ज्याला बाहुबलीच्या भव्य दिव्य सेट्स प्रमाणे बनवलं जाणार आहे. चित्रपटातील डायलॉग आणि लिरिक्स मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. तर सलोनी शर्मा आणि अंशिता देसाई मिळून चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सीता चित्रपटाशिवाय रणवीर सिंगकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. रणवीरने नुकतंच करण जौहरचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचं शूटिंग देखील सुरू केली आहे. याशिवाय तो 83 या चित्रपटात देखील दिसणार आहे.

  'यांनाही कळतं..' सुबोध भावेनं सर्वांनाच केलं निःशब्द; अभिनेत्याच्या पोस्टची सगळीकडे चर्चा

  दरम्यान काही दिवसांपूर्वी या रोलसाठी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि दीपिका पादूकोन (Deepika Padukone) यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र आता कंगनाची वर्णी या रोलसाठी लागली आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंटाशीर (Manoj Muntashir) यांनी सांगितलं की या भूमिकेसाठी दीपिका किंवा करीनाला विचारण्यात आलं नव्हतं.

  'Tiger 3'चं शूटिंग सोडून शॉपिंगवर निघाली कतरिना कैफ; VIDEO होतोय तुफान VIRAL

  करीनाला या रोलसाठी विचारण्यात आलं होतं अशी बातमी समोर आली होती. तसेच तिने या रोलसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. अशीही माहिती समोर आली होती. त्यानंतर करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच दीपिकाला देखील चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं अशी अफवा होती, मात्र मनोज यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली तसेच या रोलसाठी कोणी यंग अभिनेत्रीचा शोध घेत होतो असंही त्यांनी सांगितलं.
  Published by:News Digital
  First published: