• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'यांनाही कळतं..' सुबोध भावेनं सर्वांनाच केलं निःशब्द; अभिनेत्याच्या पोस्टची सगळीकडे चर्चा

'यांनाही कळतं..' सुबोध भावेनं सर्वांनाच केलं निःशब्द; अभिनेत्याच्या पोस्टची सगळीकडे चर्चा

अभिनेता सुबोध भावेच्या(Subodh Bhave) लेटेस्ट पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुबोध नेहमीच आपल्या हटके पोस्टने चाहत्यांना काही ना काही बोध देत असतो.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर- अभिनेता सुबोध भावेच्या(Subodh Bhave) लेटेस्ट पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुबोध नेहमीच आपल्या हटके पोस्टने चाहत्यांना काही ना काही बोध देत असतो. नुकताच सुबोधने आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram Post) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्वच विचारमग्न होत आहेत. कारण फोटोही तितकाच खास आहे. या फोटोमध्ये एका वानरने तोंडाला मास्क लावला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

  अभिनेता सुबोध भावे मराठीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोध चित्रपट, मालिकांप्रमाणेच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यां महत्वाचा संदेशही देत असतो. पुन्हा एकदा सुबोधने असंच काहीसं केलं आहे. सुबोधने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट चर्चेचा तसेच आत्मचिंतनाचा विषय बनली आहे. सुबोधने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक वानर आपल्या तोंडाला मास्क लावून बसलेला दिसत आहे. याला कॅप्शन देत सुबोधनं म्हटलं आहे, 'यांनाही कळतं'. या कॅप्शनने सर्वानांच विचार करायला भाग पाडलं आहे. (हे वाचा:' फॉर द लव्ह...' म्हणत सई ताम्हणकरनं शेअर केला सुपरक्लासी VIDEO) ही पोस्ट करत सुबोधने कोरोना नियम न पाळणाऱ्यांना चपराक दिली आहे. गेली दीड-दोन वर्षे देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच सर्वच क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. या जीवघेण्या महामारीमुळे आपल्याला २ वेळा लॉकडाऊनसारखा अनुभव घ्यावा लागला आहे. सध्या कोरोनाचं संकट थोडं निवळलं आहे. त्यामुळे अटी व नियम शिथिल करून जनजीवन सुरळीत करण्यात आलं आहे. मात्र अजूनही कोरोना नाहीसा झालेला नाहीय. त्यामुळे योग्य त्या नियमाचं पालन करणं अर्थातच मास्क, सॅननि टायझर यांसारख्या गोष्टी अत्यवश्यक आहेत. मात्र काही लोक त्यांचा अवलंब करताना दिसून येत नाहीत. त्यामुळेच सुबोधने अशी पोस्ट केली असावी. (हे वाचा:Video : Marathi Bigg Boss सीजन 3 मध्ये तुफान आणणाऱ्या सदस्यांचा First Look) सुबोध भावे मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कट्यार काळजात घुसली, बालगंधर्वसारख्या चित्रपटांतील भूमिकांनी तर त्याला विशेष स्थान निर्माण करून दिल आहे. फक्त चित्रपटच नव्हे तर नाटक आणि मालिकांमध्येही सुबोधचं मोठं सहकार्य आहे. छोट्या पदड्यावरील अलीकडेच 'तुला पाहते रे' आणि 'चंद्र आहे साक्षीला' या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. सध्या सुबोध पडद्यावर झळकत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: