• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Tiger 3'चं शूटिंग सोडून शॉपिंगवर निघाली कतरिना कैफ; VIDEO होतोय तुफान VIRAL

'Tiger 3'चं शूटिंग सोडून शॉपिंगवर निघाली कतरिना कैफ; VIDEO होतोय तुफान VIRAL

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) सध्या आपल्या 'टायगर ३' (Tiger 3) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाची शूटिंग सध्या तुर्कीमध्ये सुरु आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) सध्या आपल्या 'टायगर ३' (Tiger 3) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाची शूटिंग सध्या तुर्कीमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने टायगर ३ च्या शूटिंगचं लोकेशन कप्पादोकियामधून एक सुंदर फोटो शेअर केला होता. हा फोटो म्हणजे सलमानच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच होती. तर दुसरीकडे अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा सतत आपले फोटो शेअर करत आपल्या अपडेट्स देत आह.
  कतरिना कैफचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते अगदी जगभरात दिसून येतात. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेज पाहायला मिळतात. नुकताच कतरिनाच्या एका फॅन पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कतरिना आपल्या 'टायगर ३' चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी पोहोचली आहे. कतरिना कैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कुतूहलाचा विषय बनला आहे. तसेच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. (हे वाचा:प्रियांका चोप्राचा नवा शो ‘The Activist’ वर मोठा विवाद; अभिनेत्रीने मागितली माफी) या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ पिंक कलरच्या जर्किन आणि ब्ल्यू कलरच्या जीन्समध्ये दिसून येत आहे. या सिम्पल लूकमध्येसुद्धा कतरिना खूपच क्युट दिसत आहे. व्हिडीओमध्ये कतरिना एका सुपरमार्केटमध्ये सैरसपाटा मारत आहे. तसेच आपल्या आवडीच्या वस्तूही लक्ष देऊन शोधताना दिसून येत आहे. कतरिनाचा हा अंदाज चाहत्यांना खूपच पसंत पडत आहे. (हे वाचा:सलमान खानची भाची अलिझेची होणार बॉलिवूडमध्ये एंट्री; जाहीरातीतून झाली प्रसिद्ध) टायगर ३- सध्या कतरिना कैफ आणि सलमान खानचा टायगर ३ हा चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. टायगर २ मध्ये कतरिना आणि सलमान खान खाडी देशांमध्ये आपलं मिशन पूर्ण करताना दिसून आले होते. तर टायगर ३ मध्ये हे दोघे युरोपियन देशांमध्ये आपला मिशन राबवताना दिसून येणार आहेत. तुर्कीच्या आधी या चित्रपटाचं शूटिंग रुसमध्येही करण्यात आलं आहे. तर तुर्कीनंतर ऑस्ट्रियामध्येसुद्धा राहिलेलं शूटिंग केलं जाणार आहे. (हे वाचा:शाहरुख खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री! सलमान खाननं दिलं संकेत) बॉलिवूडमधील सर्वात बिग बजेट गाणं- या चित्रपटासाठी तुर्कीमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफवर एक रोमँटिक गाणं शूट करण्यात आलं आहे. असं म्हटलं जात आहे हे गाणं बॉलिवूडमधील सर्वात बिग बजेट आहे. फक्त या एका गाण्यासाठी ३ करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत. वैभव मर्चंटने हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे. येत्या २०२२ च्या ईदला हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: