मुंबई, 24 मे : 'स्कॅम 1992 हर्षद मेहता स्टोरी' (Scam 1992 Harshad Mehta) ही सिरीज ओटीटीवर तूफान गाजली. स्कॅम 1992च्या यशानंतर 'स्कॅम' फ्रँचायझीच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. एक फळ विक्रेता ते घोटाळ्यांचा मास्टर माइंड असा धक्क करणारा प्रवास असलेला 'अब्दुल करीम तेलगी' (Abdul Karim Telgis) यांच्या आयुष्यावर आधारित 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' (Scam 2003 The Telgi Story ) या नव्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. प्रतिक गांधी यांनी दलाल स्ट्रीटच्या बिग बुल हर्षद मेहताची भूमिका उत्तमरित्या वठवली होती. यावेळी ज्येष्ठ रंगभूमी कलाकार ‘गगन देव रियार’ (Gagan Dev Riar) हे तेलगीची भूमिका साकारणार आहेत. तेलगीच्या सीरिजच्या घोषणा करताच प्रेक्षकांनी सीरिजच्या रिलीजसाठी उत्सुकता दाखवली आहे.
कोण आहे अब्दुल करीम तेलगी?
अब्दुल करीम तेलगी हा कर्नाटकमधील प्रसिद्ध घोटाळेबाज असून बनावट स्टॅम्प पेपर बनवून त्यानं स्वत:चं साम्राज्य निर्माण केलं. अब्दुल करीम तेलगी या फळविक्रेत्याचे जीवन आणि भारतातील सर्वात कल्पक घोटाळ्यांमागचा मास्टरमाइंड बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या सीरिजमधून दाखवण्यात येणार आहे. अब्दुल करीम तेलगी याने केलेला घोटाळा अनेक राज्यांमध्ये पसरला होता. या घोटाळ्याने संपूर्ण देश हादरला गेला होता. अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकमधून जुनी प्रींटिग प्रेस आणून त्याद्वारे खोटे स्टॅम्प छापले होते. ते स्टॅम्प विकून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. 20 हजार कोटींच्या खोट्या प्रिंटींग स्टॅम्प घोटाळ्यात 2007 साली दोषी ठरवून त्याला 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2017मध्ये अब्दुल करीम तेलगी चा बंगळूरुमधील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा -
ललित, सई अन् पर्ण यांच्या प्रेमाचा ट्रँगल, मीडियम Spicyचा ट्रेलर प्रदर्शित
2003मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. ही सीरिज पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या हिंदी पुस्तकातून रूपांतरित करण्यात आला आहे. पत्रकार संजय सिंग यांनीच या घोटाळ्याचा छडा लावला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. सीरिजच्या शुटींगला सुरुवात झाली असून लवकरचं ही सीरिज SonyLIV वर पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.