मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आपल्या सिद्धूचं कौतुक करताना थकेना रणवीर सिंग; म्हणाला, त्याच्या इतका टॅलेंटेड अभिनेता...

आपल्या सिद्धूचं कौतुक करताना थकेना रणवीर सिंग; म्हणाला, त्याच्या इतका टॅलेंटेड अभिनेता...

 रणवीर सिंग-सिद्धार्थ जाधव

रणवीर सिंग-सिद्धार्थ जाधव

सिम्बा नंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सर्कस' मध्ये देखील ही जोडी झळकली आहे. आता रणवीर सिंगने सिद्धार्थ जाधवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 डिसेंबर :  बॉलिवूडमधील सर्वाधिक एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंग याचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्याचं दिलखुलास वागणं, त्याची हटके स्टाईलमुळे तो कायम चर्चेत असतो. रणवीर सिंग अभिनेता म्हणून जसा उत्तम आहे तसा तो माणूस म्हणूनही दिलखुलास आहे. रणवीरचं त्याच्या सहकलाकारांबरोबरचं वागणं अतिशय आपुलकीचं असतं. रणवीर सिंग आणि मराठीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव या दोघांची मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. आता सिम्बा नंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सर्कस' मध्ये देखील ही जोडी झळकली आहे. आता रणवीर सिंगने सिद्धार्थ जाधवचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आला आहे.

'सर्कस' सिनेमाची संपूर्ण टीम नुकतीच 'चला हवा येऊ द्या' मध्ये येऊन गेली. या शो मध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी सगळे आले होते. त्यात साबळे यांनी रणवीर सिंगला सिद्धार्थ सोबत काम करण्याचा अनुभव विचारला तेव्हा तो म्हणाला कि, 'सिद्धार्थ सोबत हा माझा दुसरा चित्रपट आहे. माझ्या आयुष्यात मी त्याच्या एवढा टॅलेंटेड अभिनेता पहिला नाहीये. एखाद्या माणसाचं चांगुलपण त्याच्या चेहऱ्यावर दिसतं तसंच  ते पडद्यावर सुद्धा झळकतं.''

हेही वाचा - रोहित शेट्टी प्रत्येक सिनेमात सिद्धार्थ जाधवला का घेतो? मराठी कलाकारांना कास्ट करण्यामागचं खरं कारण आलं समोर

तो पुढे म्हणाला, 'त्यामुळेच लोक त्याच्यावर प्रेम करतात. सिद्धार्थ जाधव हा सुपरस्टार आहे.'' अशा शब्दात रणवीरने सिद्धार्थचं कौतुक केलं. त्यावर सिद्धूने देखील कृतज्ञता व्यक्त केली. व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये खूप छान मैत्री आहे. एवढंच नाही तर सिद्धार्थच्या बालभारती चित्रपटासाठी रणवीरसिंगने खास मराठीत शुभेच्छा दिल्या होत्या. हा व्हिडीओ देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.  दोघांनी सिम्बा, सूर्यवंशी या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. तसंच रोहित शेट्टी याच्या आता सर्कस सिनेमातही या दोघांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सर्कस' सिनेमात सिद्धार्थसह विजय पाटकर, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले हे मराठमोळे कलाकारही आहेत. या कलाकारांच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत आहे.

सर्कसबाबत सांगायचं तर हा सिनेमा २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांचा फार काही प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता आपटलेला दिसून येत आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात अयशस्वी ठरला आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Marathi entertainment, Ranveer sigh