एक गोष्ट लक्षात घेतली तर मागच्या काही वर्षात रोहीत शेट्टीच्या सिनेमात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतात.
अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, अश्विनी काळसेकर, वैदेही परशुरामी, सौरभ गोखले सारखे कलाकार रोहितच्या सिनेमात दिसतात.
त्याच्या सिनेमात मराठी कलाकारांना कास्ट करण्यामागे काय कारण आहे हे विचारल्यानंतर रोहित म्हणाला, 'मराठी कलाकार हे साधे आणि प्रतिभावान आहेत'.
'मराठी कलाकार हे अंहकारी आहेत. त्यांना उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीशी जुळूवून घेतात'.
'तर आता सर्कस सिनेमातही अभिनेत्री जॅकलिनबरोबर मराठमोळे अभिनेते विजय पाटकर, अश्विनी काळसेकर हे कलाकार आहेत'.