मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranveer Singh बनला NBA चा ब्रँड अँबॅसिडर; अभिनेत्याला बालपणापासूनच आहे बास्केटबॉलवर प्रेम

Ranveer Singh बनला NBA चा ब्रँड अँबॅसिडर; अभिनेत्याला बालपणापासूनच आहे बास्केटबॉलवर प्रेम

रणवीर सिंह २०१६ मध्ये NBA च्या ऑल स्टार टोरँटो लीगमध्ये सहभागी झाला होता. तसेच आता रणवीर २०२२ मध्येही सहभागी होणार आहे.

रणवीर सिंह २०१६ मध्ये NBA च्या ऑल स्टार टोरँटो लीगमध्ये सहभागी झाला होता. तसेच आता रणवीर २०२२ मध्येही सहभागी होणार आहे.

रणवीर सिंह २०१६ मध्ये NBA च्या ऑल स्टार टोरँटो लीगमध्ये सहभागी झाला होता. तसेच आता रणवीर २०२२ मध्येही सहभागी होणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 ऑक्टोबर- अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) बॉलिवूडमधील(Bollywood) टॉपचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. रणवीरने मोठ्या मेहनतीने हे यश प्राप्त केलं आहे. रणवीरचा चित्रपट येताच त्याला सुपरहिटची पावती मिळते. रणवीरने पुन्हा एकदा मोठं यश मिळवलं आहे. नुकताच रणवीर सिंहला NBA (National Basketball Association) अर्थातच नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आल आहे.

अभिनेता रणवीर सिंहने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक रोलची नेहमीच तुफान चर्चा होते. चित्रपटांसोबतचं रणवीर अनेक कंपन्यांसाठी त्यांच्या जाहिरातींचा चेहरा बनला आहे. तो सतत नवनवीन जाहिरातींमध्ये दिसून येतो. नुकताच रणवीर सिंहने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रणवीरने आपल्या इन्स्टाग्रामवरून बास्केटबॉल खेळत असताना काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने कॅप्शन लिहीत आपण आता नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनसोबत जोडलं गेलं असल्याचं सांगितलं आहे.

(हे वाचा:इरफान खानच्या आठवणीत पुन्हा भावुक झाला मुलगा बाबिल; शेअर केला थ्रोबॅक PHOTO)

ररणवीर सिंह NBA सोबत २०२१-२२च्या ऐतिहासिक ७५ व्या वर्षी बास्केटबॉल लीगचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रणवीर सिंहने म्हटलं आहे, 'मी NBA कुटुंबात सहभागी होण्यासाठी तसेच NBA चा ब्रँड अँबॅसिडर होण्यासाठी उत्सुक आहे. बास्केटबॉल एक असा खेळ आहे जो माझा बालपणापासूनचा आवडता खेळ आहे. बास्केटबॉल या खेळाची आपल्या देशातील लोकांमध्ये आवड निर्माण करण्याची संधी मिळणं हे खूपच रोमांचकारक आहे'. तसेच रणवीरने म्हटलं, 'मला NBA च्या गम्स खेळायलाही प्रचंड आवडतं. कारण यामध्ये लागणारं स्पिरिट आणि उत्साह रोमांचित आहे'. खेळाच्या मैदानात आणि बाहेरही खेळाडूंचा उत्साह अजब असतो. मला या सर्व खेळाडूंचं कौतुक आहे'.

(हे वाचा:Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स)

रणवीर सिंह २०१६ मध्ये NBA च्या ऑल स्टार टोरँटो लीगमध्ये सहभागी झाला होता. तसेच आता रणवीर २०२२ मध्येही सहभागी होणार आहे. यामध्ये रणवीर पडद्या पाठीमागून सोशल मीडिया कंटेंट शेअर करणार आहे. तसेच NBA च्या दिग्ग्ज खेळाडूंची मुलाखतसुद्धा घेताना दिसून येणार आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, रणवीर सिंग लवकरच '८३'मध्ये झळकणार आहे. तसेच येत्या काळात रणवीर रॉकी और राणी कि प्रेमकहाणी, जयेश भाई जोरदार, सर्कस आणि सूर्यवंशी या चित्रपटातही दिसून येऊ शकतो.

First published:

Tags: Entertainment, Ranveer sigh