मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स

Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल्स

सिद्धार्थच्या  मृत्यूनंतर शेहनाज गिल संपूर्ण जगापासून अलिप्त झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. ती सोशल मीडियावरही अजून परतलेली नाहीय.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिल संपूर्ण जगापासून अलिप्त झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. ती सोशल मीडियावरही अजून परतलेली नाहीय.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिल संपूर्ण जगापासून अलिप्त झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. ती सोशल मीडियावरही अजून परतलेली नाहीय.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5ऑक्टोबर- प्रसिद्ध अभिनेता आणि  'बिग बॉस १३' (Bigg Boss 13 Winner) विजेता  सिद्धार्थ  शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक निधनाने संपूर्ण देश हादरला होता. त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. सिद्धार्थची आई आणि त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलला(Shehnaz Gill) यातून सावरण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत. सध्या त्यांची अवस्था थोडी सर्वसाधारण होत असल्याचं दिसत आहे.सिद्धार्थच्या  मृत्यूनंतर शेहनाज गिल संपूर्ण जगापासून अलिप्त झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. ती सोशल मीडियावरही अजून परतलेली नाहीय. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. मात्र नुकताच अशी माहिती समोर आली आहे, शेहनाज ७ ऑक्टोबरला एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी सेटवर येऊ शकते.

अभिनेत्री शेहनाज गिलला बिग बॉसनंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनतर ती अनेक शोमध्ये गेस्ट म्हणून दिसून आली. तसेच ती अनेक फोटोशूट्सही करताना दिसली होती.इतकंच नव्हे तर ती अल्बममध्येही झळकली होती. त्यांनतर शेहनाज गिलची वर्णी एका पंजाबी चित्रपटातसुद्धा लागली होती. या चित्रपटात ती पंजाबी सिंगर आणि अभिनेता दलजित दोसानजीसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. त्यांनतर मेकर्सनी शेहनाज गिलसोबत चित्रपटासाठी प्रोमोशनल गाणं शूट करायचं ठरवलं होतं. शेड्युलही ठरवण्यात आलं होतं. मात्र अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने शेहनाज गिलला फार मोठा धक्का बसला आहे.तिला स्वतःला सावरणं कठीण झालं होतं. त्यामुळे ती सेटवर येणं शक्यचं नव्हतं. आणि म्हणूनच हे शेड्युल पुढं ढकलण्यात आलं होतं.

(हे वाचा:Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज ... )

मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती समोर येत आहे, की चित्रपटाचे मेकर्स या गाण्याच्या शूटिंगसाठी शेहनाज गिलला समजावण्याचा आणि तिला तयार करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना यामध्ये यश आलं आहे. येत्या ७ ऑक्टोबरला शेहनाज 'होंसला रख'च्या प्रोमोशनल गाण्याचं शूट करण्यासाठी सेटवर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच इ टाइम्सला दिलेल्या एक मुलाखतीत चित्रपटाचे निर्माता दलजित  थिंड  यांनी म्हटलं आहे, 'आमची टीम सतत शेहनाजच्या टीमसोबत संपर्कात होती. आम्ही सतत तिच्या हेल्थ अपडेट्स घेत होतो. त्यानंतर ती बऱ्यापैकी स्थिर झाल्यानांतर आम्ही तिला या गाण्याच्या शूटसाठी तयार केलं आहे. आम्हाला आनंद आहे की ती एक प्रोफेशनल मुलगी आहे, ती या शूटसाठी तयार झाली आहे. तसेच आम्ही तिच्या व्हिजाच्या आधारे गाण्याचं शूटिंग परदेशात किंवा देशात करू'.

(हे वाचा:सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज ... )

तसेच थिंन्ड यांनी शेहनाज गिलच्या हेल्थबद्दल खुलासा करत म्हटलं, 'सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाज पूर्णपणे तुटून गेलीय. तिला यातून सावरणं खूपच कठीण आहे. मात्र तिने आपल्या कमेंटमेंट्स पूर्ण करण्यासाठी खूप मोठं धाडस दाखवलं आहे. तिला अजूनही सिद्धार्थच्या आठवणीतून बाहेर पडता येत नाहीय. मात्र फार मोठ्या धैर्याने तिनं शूटिंगसाठी होकार दिला आहे. ती आमच्यासाठी आमच्या कुटुंबातील सदस्यासारखी आहे त्यामुळे आम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू इच्छित नव्हतो. आता आम्हाला फक्त हीच अपेक्षा आहे शेहनाज लवकरात लवकर सर्वसामान्य स्थितीत यावी आणि आपल्या कामामध्ये रममाण व्हावी'.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla