Home /News /entertainment /

इरफान खानच्या आठवणीत पुन्हा भावुक झाला मुलगा बाबिल; शेअर केला थ्रोबॅक PHOTO

इरफान खानच्या आठवणीत पुन्हा भावुक झाला मुलगा बाबिल; शेअर केला थ्रोबॅक PHOTO

अभिनेता इरफान खान बॉलिवूडमधील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जात होता. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

  मुंबई, 5ऑक्टोबर- अभिनेता इरफान खानच्या(Irrfan Khan) आठवणीत पुन्हा मुलगा  बाबिल (Babil Khan)भावुक झाला आहे. बाबिल ने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि वडील इरफान खानचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बाबिल खूपच लहान दिसून येत आहे. या बाप-लेकाला एका फ्रेममध्ये पाहून सर्वच भावुक होत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Babil (@babil.i.k)

  अभिनेता इरफान खान बॉलिवूडमधील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जात होता. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. लढवय्या इरफान खानला अखेर कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजाराने हरवले. इरफान खानचं असं निघून अनेकांना पटणारं नव्हतं. चाहत्यांसोबतचं आजही सर्व मनोरंजनसृष्टी इरफानच्या आठवणीत भावुक होत असते. इरफान खानचा मुलगासुद्धा सतत आपल्या पित्याच्या आठवणींना उजाळा देत असतो. अभिनेता इरफान खान आणि मुलगा बाबिल यांच्यामध्ये फारच स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं हे आपण सतत पाहतो. या दोघांचे थ्रोबॅक फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच बाबिल वडील इरफान खानच्या आठवणीत पुन्हा एकदा भावुक झाल्याचं दिसला. (हे वाचा:Shehnaz Gill या दिवशी शूटिंगवर परतणार; जाणून घ्या डिटेल) इरफान खानचा मुलगा बाबिलने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या थ्रोबॅक फोटोमध्ये बाबिल इरफान खानसोबत दिसून येत आहे. बाबिलने आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला आहे. या फोटोमध्ये दोघे बापलेक जवळजवळ एकसारखे भासत आहेत. तसेच या फोटोला बाबिलने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कॅप्शन लिहीत बाबिलने म्हटलं हे, 'मकबूल के बांबीने किसने हाथ डाला'. हा फोटो पाहून यूजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. अनेकांनी कमेंट करत इरफान खानला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. तर एका यूजरने कमेंट करत बाबिलला झेरॉक्स कॉपी म्हटलं आहे. तर काहींनी कमेंट् करत जादुई फोटो म्हटलं आहे. या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे. (हे वाचा:शाहरूख खानची Xerox कॉपी आहे मुलगा Aryan Khan, बोलणं आणि बॉडीलँग्वेजही सारखीच) इरफान खानचा मुलगा बाबिल खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बाबिल अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत असलेल्या 'काला' या चित्रपटात काम करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीसुद्धा आहे. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर करत बाबिलला शुभेच्छा दिल्या होत्या. इरफान खानच्या निधनानंतर बाबिलने आपल्या वडिलांमार्फत फिल्मफेअर पुरस्कार स्विकारला होता. 'अंग्रेजी मिडीयम' चित्रपटासाठी इरफानला हा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Irrfan khan

  पुढील बातम्या