जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे GOOD NEWS? बाळांच्या नावाची यादीही तयार

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे GOOD NEWS? बाळांच्या नावाची यादीही तयार

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे GOOD NEWS? बाळांच्या नावाची यादीही तयार

रणवीर सिंहने त्याच्या लग्नाबद्दल आणि त्याने मुलांच्या नावाचा विचार करायला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई , 16 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh ) आणि पत्नी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच रणवीरचा ‘द बिग पिक्चर’च्या (The Big Picture) शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात रणवीरने त्याच्या  (ranveer deepika baby name list) लग्नाबद्दल आणि त्याने मुलांच्या नावाचा विचार करायला सुरुवात केल्याचे देखील सांगितले आहे. ‘द बिग पिक्चर’ हा रिअॅलिटी शो आजपासून सुरू होत आहे. रणवीर या प्रोमोमध्ये त्याच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी बोलताना म्हणतो आहो की, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझं लग्न झालं आहे आणि आता दोन ते तीन वर्षात माझी मुलं होतील. भाऊ, तुमची वहिनी दीपिका लहान असताना इतकी सुंदर होती. मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहत होतो आणि म्हणत होतो की, मला अशीच एक मुलगी दे जी माझं आयुष्य बदलून टाकेल. मी तर नाव शॉर्टलिस्ट करत आहे. जर मी तुमचं नाव शौर्य त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना?..असं रणवीर या प्रमोमध्ये म्हणताना दिसत आहे.

जाहिरात

शोच्या सुरुवातीला रणवीर स्पर्धकासह ‘राम लीला गोलियों की रासलीला’ या चित्रपटातील ‘ततड़ ततड़’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर रणवीर स्पर्धकाची ओळख करून देतो आणि म्हणतो, “कृपया लक्षात घ्या. त्याचा स्वॅग खूप भारी आहे आणि त्याचा अंदाज शहरात चर्चेचा विषय राहिली आहे. कृपया गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील अभय सिंह यांचे स्वागत करा. वाचा : नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच! अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असणारं जोडपं म्हणजे रणवीर सिंह -दीपिका पादुकोण होय. सोशल मीडियावरही हे दोघे प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच चाहतेसुद्धा या दोघांची जाईल प्रचंड पसंत करतात. रणवीर सिंह पत्नी दीपिका पदुकोणची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाही. दोघांचे खास बॉन्डिंग पाहून त्यांना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जाते. वाचा : करिनाने खास अंदाजात सैफला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला थ्रोबॅक PHOTO रणवीर सिंह ‘द बिग पिक्चर’ शो सुरूहोण्यासाठी जितका उत्साहित होता, तितकाच तो अस्वस्थसुद्धा होता. रणवीरने याविषयी सांगितले की, दीपिकाला त्याची ही समस्या जाणवली होती. त्यामुळे ‘दीपिका पादुकोणने ‘द बिग पिक्चर’च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी माझ्यासाठी फुले आणि स्वतः हाताने लिहिलेलं एक पत्र पाठवलं होतं. आणि ते पाहून मला फार छान वाटलं होतं. मला मोठा धीर मिळाला होता’. ते सरप्राईज माझ्यासाठी फार खास असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 16 ऑक्टोबरपासून कलर्स, वूट आणि जिओ टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता ‘द बिग पिक्चर’ दाखवला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात