जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच! अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT

नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच! अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT

nusrat jahan and yash dasgupta

nusrat jahan and yash dasgupta

तृणमुल काँग्रेसच्या खासदार(TMC) आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16ऑक्टोबर- तृणमुल काँग्रेसच्या खासदार**(TMC)** आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने आपलं आणि यश दास गुप्ताचं एक खास नातं असल्याचं मान्य केलं आहे. तसेच अभिनेत्रीने आपल्या बाळाचे वडील यशच असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र या दोघांनी अजून लग्न केलं आहे की नाही यावर अजून प्रश्न चिन्ह आहे. मात्र अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेल्या एका फोटोमुळे या दोघांचं लग्न झालं असल्याचं पुरेपूर विश्वास चाहत्यांना होत आहे.

News18

यश दासगुप्ताच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोनंतर, नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो असे आहेत ज्यामध्ये दोघांनी त्यांच्या नवीन नात्याला नाव दिलं असल्याचं भासत आहे. खरं तर, नुसरत जहाँने शुक्रवारी विजयादशमीच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता. आणि त्यात तिने विवाहित बंगाली महिला परिधान करतात तसा शाख पोला परिधान केला होता.तसेच नुसरतने तिच्या कपाळावर लाल रंगाची टिकली लावली आहे. नुसरतचा हा साधा-सरळ लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने बंगालीमध्ये विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (**हे वाचा:** Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले स्क्रिनिंगला ) तसेच अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. स्टोरीला शेअर केलेला हा फोटो एका केकचा फोटो होता. तो यश दास गुप्ताच्या वाढदिवसाचा केक असल्याचं स्पष्ट कळत होतं. त्यावर YD(अर्थातच यशदास ) हसबंड आणि डॅड असं लिहिलं होतं. त्यामुळे चाहत्यांना यांचं लग्न झालं असल्याचं कन्फर्म होत होतं. मात्र या दोघांनी अजूनही आपल्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाहीय.

जाहिरात

सोशल मीडियावरील चाहते तिला तिच्या आणि यशच्या लग्नाबद्दल विचारत आहेत, तसेच सणाच्या शुभेच्छा देत आहेत. नुसरत आणि यश यांनी यापूर्वी नवरात्री आणि दुर्गा पूजा पंडालमधील फोटो शेअर केले होते. एका फोटोमध्ये नुसरत यशच्या मांडीवर बसलेली दिसली होती. 26 ऑगस्ट 2021 रोजी अभिनेत्रीने मुलगा इशानला जन्म दिला होता. मुलाच्या वडिलांबद्दल अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं गेलं होतं. मात्र नंतर मुलाचे जन्म प्रमाणपत्र व्हायरल झाल्यांनतर त्यात वडिलांचे नाव यश दासगुप्त असं लिहिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात