अभिनेत्री करिना कपूरने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपला थ्रोबॅक फोटो शेअर करत पतीला शुभेच्छा दिल्या आहेत, यामध्ये तिनं म्हंटल आहे,ग्रीसमध्ये एकेकाळी (US)समोर सूपचा वाडगा होता आणि त्याने माझे आयुष्य बदलले... जगातील सर्वात देखण्या माणसाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'.
अशा खास अंदाजात अभिनेत्री करिना कपूरने पती सैफ अली खानला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. तसेच युजर्स या दोघानं शुभेच्छा देत आहेत.
बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं म्हणून सैफ अली खान आणि करीना कपूर यांना ओळखलं जातं. हे जोडपं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. अस म्हटलं जातं सैफ आणि बेबो पहिल्यांदा 2008 मध्ये टशन चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.
शूटिंग दरम्यान, सैफ आणि करिनामध्ये जवळीकता वाढली होती. दीर्घ रिलेशनशिपनंतर या दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी एकेमकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
करीना कपूर सैफ अली खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघेही तैमूर अली खान आणि जेह या दोन सुंदर मुलांचे पालक आहेत. दोघेही आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहेत.