रणवीर सिंगवर लागला चोरीचा आरोप, WWE रेसलरने घेतलं फैलावर

ranveer singh हार्दिक पांड्यामुळे अडकला रणवीर सिंग

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 11:33 AM IST

रणवीर सिंगवर लागला चोरीचा आरोप, WWE रेसलरने घेतलं फैलावर

मुंबई, 20 जून- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या व्यक्तिरेखेत फारच मिसळून गेला आहे. त्याचा आगामी ८३ सिनेमात तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच तो भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघाला पाठिंबा द्यायला गेला होता. इथे त्याने अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत व्हिडिओ आणि सेल्फी काढले. हे कमी की काय त्याने काही वेळेसाठी समालोचनची जबाबदारीही स्वीकारली. हे सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या एका फोटोवर रणवीरला WWE चा प्रसिद्ध रेसलरकडून चांगलंच ऐकून घ्यावं लागलं. त्याने फक्त रणवीरला सुनावलंच नाही तर चोरीचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला.

Photo- लंडनच्या रस्त्यांवर एकमेकात गुंतले 'विरुष्का', जगाचा पडला विसर

रणवीरने एकीकडे सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसोबत फोटो शेअर केले तर हार्दिक पांड्यासोबतही फोटो शेअर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिली. पांड्याच्या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya. @hardikpandya7 ma boi #unstoppable'. रणवीरच्या या कॅप्शनवर WWE चा प्रसिद्ध रेसलर ब्रोक लेन्सरचा वकील पॉल हेमैन नाराज झाला आणि रागात त्याने ट्विटरवरच रणवीरची शाळा घेतली.


हेमैनला राग यासाठी आला की, 'Eat. Sleep. Dominate. Repeat.' हे वाक्य ब्रॉक लेन्सरच्या रिंगमधील एण्ट्रीला वापरलं जातं. हेमैनच्या मते, या वाक्यावर त्याचे कॉपीराइट आहेत. रणवीरचं ट्वीट शेअर करताना हेमैनने लिहिले की, @RanveerOfficial, ARE YOU KIDDING ME??????????? 1 - It's Eat Sleep CONQUER Repeat 2 - Copyright #YourHumbleAdvocate and @BrockLesnar 3 - I am litigious 4 - EAT SLEEP DEPOSITION REPEAT.

Loading...

'शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS'

याचा अर्थ की, हेमैनने रणवीरवर कॉपीराइटवरून चोरीचा आरोप केला. पण हेमैन रागाने नाही तर मस्करीत बोलत होता. याआधीही त्याने ट्विटरवर आपल्या या वाक्याचा अनेकदा वापर केला आहे. आता या प्रकरणात रणवीरने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. आता हे पाहणं उत्सुकतेचं असेल की हेमैनच्या या मजेशीर ट्वीटला रणवीर काय उत्तर देतो.

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 09:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...