बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नवऱ्याला भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी लंडनला गेली आहे. सध्या सोशल मीडियावर विराट- अनुष्काचे लंडनच्या रस्त्यांवर मनमुराद फिरतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. विराट कोहलीच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, विराट आणि अनुष्का लंडनमधील ओल्ड बॉण्ड स्ट्रीटवर आज एकत्र दिसले.सध्या टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये एका छोट्या ब्रेकवर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तानविरोधात आहे. त्यामुळे सध्या विराट- अनुष्का एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारताचा आतापर्यंतचा प्रवास समाधानकारक आहे. आतापर्यंत भारताने चार सामने खेळले असून त्यातील तीन सामन्यात भारताला विजय मिळाला तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अंकतालित सध्या भारत तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या रविवारी भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. भारताच्या या दणदणीत विजयानंतर टीम इंडियाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. एवढंच नाही तर बॉलिवूडचे अनेक कलाकार भारत- पाकिस्तानची हा सामना पाहण्यासाठी मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानात पोहोचले होते.
VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?