बॉलिवूडमध्ये सध्या अनेकजण गूडन्यूज देत असल्याचं पहायला मिळत आहे. आलिया-बिपाशानंतर आता वरुण धवन आणि नताशादेखील गूडन्यूज देणार असल्याचं समोर येत आहे.
वरुण धनवनने त्याचा आगामी चित्रपट 'भेडिया'च्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच 'बिग बॉस 16'मध्ये हजेरी लावली. यावेळी सलमानने वरुणचं एक गुपितंही उघड केलं आहे.
वरुण आणि क्रिती 'भेडिया'च्या प्रमोशनच्या निमित्ताने बिग बॉसमध्ये आले होते. यावेळी सलमानने दोघांसोबत एक गेम खेळला. यामध्ये त्यांना गाणी आणि चित्रपटांची नावं ओळखायची होती. गेमच्या शेवटी सलमान वरुणला एक सॉफ्ट टॉय देतो.
वरुण सलमानला म्हणतो, मी या सॉफ्ट टॉयचं काय करु? मला अजून मूलसुद्धा नाही. यावर सलमान म्हणतो हे सॉफ्ट आलंय आता मूलही येईल. तेव्हापासून वरुण नताशा आई-वडिल बनणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
सलमान खानने वरुण आणि नताशाला आई-वडील होण्याचा इशारा दिल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. या चर्चांमुळे वरुण-नताशाचे चाहतेही आनंदी झाले आहेत.
आता वरुण आणि नताशा खरंच आई-वडिल होणार आहेत का? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे सध्या तरी या अफवा आहेत.