मुंबई, 10 सप्टेंबर- 67 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा नुकतंच पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला यावेळी त्याच्या ‘83’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे. यामध्ये त्याने भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली होती. व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्विकारताना रणवीर भावुक झाला. इतकंच नव्हे तर त्याला अश्रू आवरणंदेखील कठीण झालं होतं. रणवीर सिंहने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणत आहे, ‘माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, आणि घडत आहे. ते माझ्या विचारांच्या पलीकडे आहे. मला आजही विश्वास बसत नाही की मी बॉलिवूडचा एक भाग आहे. खरंच मला विश्वास बसत नाही की मी आता एक अभिनेता बनलो आहे. माझ्यासाठी हे सर्वकाही एखाद्या गोड स्वप्नासारखं आहे. हा संवाद साधताना रणवीर सिंह भावुक होतो. आणि त्याला व्यासपीठावरच रडू कोसळतं. पुढे बोलताना रणवीर म्हणाला, ‘मी सर्वात आधी, प्रेक्षकांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण आज त्यांच्यामुळे मला माझं स्वप्न जगायला मिळत आहे. त्यांच्या प्रेमामुळे इथे पोहोचलो आहे. शिवाय अभिनेत्याने आपल्या आईवडिलांचे आभार मानत म्हटलं, मी आज जो कुणी आहे, तो माझ्या आईबाबा आणि बहिणीमुळे, ते माझ्यासाठी देवासमान आहेत. मी जे काही आहे ते माझ्या या देवामुळे. आणि मी आज जे काही करत आहे ते या देवासाठी. असं म्हणत अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
**(हे वाचा:** Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट ) सोबतच अभिनेत्याने आपली पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणला आपल्या घरची लक्ष्मी म्हटलं आहे.तसेच दीपिका आपली ताकत असल्याचंही म्हटलं आहे. रणवीर पुरस्कार घेताना, बॅक स्टेजला जाऊन दीपिकाला हात धरुन सर्वांसमोर घेऊन येतो. आणि अगदी रोमँटिक होत अभिनेत्रीला किस करत आपल्या भावना व्यक्त करतो. रणवीर सिंहचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.