मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण डेहराडूनमध्ये साजरी केली मॅरेज अॅनिवर्सरी; VIDEO होतोय व्हायरल

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण डेहराडूनमध्ये साजरी केली मॅरेज अॅनिवर्सरी; VIDEO होतोय व्हायरल

बॉलिवूडचा अतरंगी स्टार अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या लग्नाला 14 नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. दोघेही त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस(Ranveer Singh Deepika Padukone Marriage Anniversary) डेहराडूनमध्ये साजरा करत आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 नोव्हेंबर : बॉलिवूडचा अतरंगी स्टार अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या लग्नाला 14 नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. दोघेही त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस(Ranveer Singh Deepika Padukone Marriage Anniversary) डेहराडूनमध्ये साजरा करत आहेत. बॉलीवूडच्या या गोंडस जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत शुभेच्छा दिल्या जात आहेत. रविवारी, रणवीर आणि दीपिका डेहराडून विमानतळावर दिसले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या आय़ुष्यातील खास दिवस असेल किंवा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी बाहेरच्या देशांना म्हणजे परदेश वारीला देतात. पण रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस देशातच साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आयुष्यातील हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी उत्तराखंडला पोहोचले.पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर डेहराडूनमधील जॉली ग्रँट विमानतळाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून चालत आहेत. व्हिडिओमध्ये रणवीर सिंहने चेकर्ड ट्रॅकसूट घातला आहे आणि दीपिका पदुकोणने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. वाचा : सिद्धार्थच्या आठवणीने व्याकूळ झाली Shehnaz; कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडली, VIDEO यापूर्वीही रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनीही त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस देशातच साजरा केला होता. त्यावेळी दोघेही दक्षिणेतील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते, त्यानंतर दोघेही पंजाबमधील सुवर्ण मंदिरात नतमस्तक होताना दिसले. दोन्ही स्टार्सनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. वाचा : कंगनाच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची अशी होती प्रतिक्रिया 14 नोव्हेंबर 2018 रोजी दीपिका आणि रणवीरचे इटलीत लग्न झाले. दोघांनी आधी कोकणी आणि नंतर सिंधी रितीरिवाजानुसार लग्न केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि बंगळुरूमध्ये रिसेप्शन पार्ट्या दिल्या. सध्या रणवीर सिंह त्याच्या करिअरमधील पहिला टीव्ही शो 'द बिग पिक्चर' होस्ट करत आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये रणबीर म्हणाला होता की, तो फॅमिली प्लॅन करण्याचा विचार करत आहे. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
  दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर आणि दीपिका '८३' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Ranveer singh

  पुढील बातम्या