Home /News /entertainment /

सिद्धार्थच्या आठवणीने व्याकूळ झाली Shehnaz Gill; कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली, VIDEO

सिद्धार्थच्या आठवणीने व्याकूळ झाली Shehnaz Gill; कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली, VIDEO

एका मुलाखतीदरम्यान शेहनाज कॅमेऱ्यासमोरच सिद्धार्थच्या आठवणींमुळे रडत असल्याचं दिसून आलं. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून, चाहत्यांनी तिला आता सावरण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याचं निधन होऊन आता दोन महिने होत आले आहेत. सिद्धार्थच्या अचानक, अनपेक्षितपणे आणि अकाली झालेल्या निधनामुळे चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. त्याची मैत्रीण शेहनाज गिल (Shehnaz Gill) हिला बसलेला धक्का तर खूपच मोठा आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर बराच काळ ती त्या धक्क्यातून अजिबातच सावरली नव्हती. त्यानंतर तिने हळूहळू कामावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. तरीही अद्याप ती सिद्धार्थला गमावल्याचं दुःख विसरलेली नाही आणि ते साहजिकही आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ती कॅमेऱ्यासमोरच सिद्धार्थच्या आठवणींमुळे रडत असल्याचं दिसून आलं. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून, चाहत्यांनी तिला आता सावरण्याचा सल्ला दिला आहे. 'झी न्यूज'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उशिरा एन्ट्री, लवकर एग्जिट! Bigg Boss Marathi च्या घरातून निथा शेट्टी आऊट सिद्धार्थ शुक्ला हा शेहनाजचा एकदम जवळचा मित्र होता. वयाच्या अवघ्या चाळिशीत असताना सिद्धार्थला काळाने ओढून नेलं. हार्ट अॅटॅक (Heart Attack) हे त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला. आपण आता एकटे पडले आहोत, ही भावना शेहनाजचं दुःख अधिकच गहिरं करत आहे. काही दिवसांपूर्वीच 'हौंसला रख' (Haunsala Rakh) हा शेहनाजचा पहिला सिनेमा रीलिज झाला. हा पंजाबी सिनेमा (Punjabi Cinema) आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज या सिनेमाच्या प्रमोशनमध्येच पहिल्यांदा नजरेस पडली होती. (Shehnaz Gill Debut) या सिनेमाच्या प्रमोशनवेळचाच (Cinema Promotion) एक न पाहिलेला व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत शेहनाज सिद्धार्थची आठवण काढून अक्षरशः ढसाढसा (Shehnaz Gill Crying) रडताना दिसत आहे. त्यावेळी दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh) तिला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरीही शेहनाजला रडू आवरत नाहीये. हा व्हिडिओ पाहून सिद्धार्थ आणि शेहनाजचे चाहते (Sidnaaz) भावुक झाले आहेत. कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान या व्हिडिओवर चाहत्यांनी (Viral Video) अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिला सावरण्याचा सल्ला चाहते देत आहेत. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. जवळचा माणूस गमावल्याचं दुःख किती मोठं असतं, याची प्रचीती हा व्हिडिओ पाहिल्यावर येत आहे. माणूस गमावल्याचं दुःख मोठं असलं, तरी तो माणूस परत येणं काही शक्य नसतं. त्यामुळे त्या दुःखातून लवकर सावरायला हवं, असा सल्ला तिला दिला जात आहे.
First published:

Tags: Siddharth shukla, Star celebraties

पुढील बातम्या