नवी मुंबई, 14 नोव्हेंबर : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला 19 47 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. एवढंच काय तर तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणीही केली जात आहे. तिच्या या वक्तव्यावचं नुकतचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. या सर्व प्रकराणावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पनवेलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा कंगनाच्या (Kangana Ranaut) वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. वाचा : सेना-भाजप युतीबद्दल फडणवीसांकडून चूक झाली का? चंद्रकांत पाटलांचा खुलासा यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, कंगना रणावतने हे म्हणायला हरकत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागलाय. पण 1947 साली भेटलेल्या स्वतंत्र्याबद्दल त्यांनी टिप्पणी करण्याचं कारण नाही त्यांना तो अधिकार नाही, असं पाटील म्हणाले. वाचा : स्वातंत्र्य भीक मिळाल्याच्या कंगनाच्या विधानाला विक्रम गोखलेंचा पाठिंबा यासोबतच यावेळी पत्रकारांनी विक्रम गोखले यांच्या विधानावर देखीलल प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘विक्रम गोखले यांनी शिवसेना आणि भाजपची युती व्हायला पाहिजे होती. फडणवीस यांनी ही चूक झाल्याचे म्हटलं होतं. याबद्दल पत्रकारांनी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘या देशाच्या लोकशाहीची सुंदरता हीच आहे की कोणीही काहीही बोलू शकतो. विक्रम गोखले यांना जे वाटलं त्यांनी ते म्हटलं. आम्हाला आमची कुठलीही चूक वाटत नाही. आम्ही त्यावेळी उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती घ्या असे म्हटलं. त्यामुळे आमची कुठलीही चूक नाही.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.