Elec-widget

लता मंगेशकरांच्या प्रतिक्रियेवर रानू मंडलं यांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाल्या...

लता मंगेशकरांच्या प्रतिक्रियेवर रानू मंडलं यांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाल्या...

रानू यांच्या गाण्यावर, 'कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं', अशी प्रतिक्रिया लता दीदींनी दिली होती.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : रानू मंडल हे नाव आता सर्वपरिचित आहे. त्यांच्या जादुई आवाजानं सर्वांनाच वेड लावलं. आज रानू यांना ओळखत नाही असं आता क्वचितच कोणीतरी सापडेल. नुकतंच रानू यांचं पहिलं गाणं ‘तेरी मेरी कहानी’ रिलीज झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपीसून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा ‘तेरी मेरी काहानी’ या गाण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वांनाच रानू यांच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजची उत्सुकता होती. या गाण्याचा टीजर हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

दरम्यान रानू यांच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली जाऊ लागली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लता मंगेशकर म्हणाल्या, "माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असतं." कुठलीही आणि कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं, अशी प्रतिक्रिया लता दिदींनी दिली होती. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात येत होतं. पण आता लता दीदींच्या वक्तव्यावर स्वतः रानू मंडल यांनी आपलं प्रतिक्रिया दिली आहे.

श्रद्धा कपूर 6 वर्षांपासून 'या' गंभीर आजाराविरोधात देतेय लढा

लता दीदीच्या सल्ल्याबद्दल रानू म्हणाल्या, 'मी लहानपणापासूनच लता दीदींची गाणी ऐकत आले आणि त्यानुसार गाण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्या खूप आवडतात आणि मी त्यांची चाहती आहे. लोक मला सांगतात की माझा आवाज लता दीदींशी मिळता जुळता आहे. हे ऐकल्यावर मला नशीबवान असल्यासारखं वाटतं. लता दीदी खरंच महान आहेत. '

Loading...

Ayushmann Khurrana : बर्थडे बॉयची Dream Girl ची 'पूजा' आहे तरी कशी?

याआधी लता दीदींच्या वक्तव्यावर हिमेशनं आपली प्रतिक्रिया दिली होती.हिमेश म्हणाला, माझ्या मते, रानू यांना हे टॅलेंट जन्मताच मिळालं आहे. त्यांनी लताजींकडून प्रेरणा नक्कीच घेतली आहे. मात्र मला नाही वाटत की लताजींसारखं महान गायक कोणी होऊ शकेल. त्या बेस्ट आहेत. रानू यांनी आत्ताच त्यांचं करिअर सुरू केलं आहे. मला वाटतं लोकांनी लता दीदींना चुकीचं समजलं आहे. त्यांनी रानू यांना सल्ला दिला आहे की, प्रेरणा घेणं चांगली गोष्ट आहे मात्र कोणाचीही कॉपी करु नये आणि रानू यांना कोणाचा आवाज कॉपी केलेला नाही.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मधल्या लवंगीबाईचं 'हे' गुपित तुम्हाला माहीत आहे का?

‘एक प्यार का नगमा है’ गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

=================================================

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...