

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या लवंगीबाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. संभाजी महाराजांनी कोंडाजी बाबांना जंजिऱ्यावर पाठवलं. त्यांनी सिद्धीशी मैत्रीचं नाटक केलं. संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला जिंकायचा होता.


त्यावेळी सिद्धीनं लवंगी दासी कोंडाजी बाबांना भेट दिली होती. या लवंगी बाईवर कोंडाजी फर्जंद यांचं प्रेम होतं आणि तिच्यामुळेच मराठ्यांची जंजिरा मोहीम फसली, अशा काही आख्यायिका इतिहासात आहेत.


लवंगीची भूमिका साकारतेय स्वरांगी मराठे. स्वरांगी 10 वर्षांची असताना तिनं आभाळमाया मालिकेत चिंगी साकारली होती.


स्वरांगीनं बाजीराव मस्तानी सिनेमात झुमरीची भूमिका साकारली होती. पोरबाजार, मानुस, हृदयनाथ अशा सिनेमांमध्ये तिनं भूमिका केल्यात.


स्वरांगीचे आजोबा म्हणजे पंडित राम मराठे. तिचे वडील मुकुंद मराठे शास्त्रीय गायक. स्वरांगीनं जगभरात गाण्याचे कार्यक्रम केलेत.