साहो आणि छिछोरे असे एकामागोमाग एक दोन सुपरहिट सिनेमे दिल्यानं अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सगळीकडे चर्चेत आहे.
आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी श्रद्धा मागच्या 6 वर्षांपासून एक गंभीर आजारानं ग्रस्त आहे.
श्रद्धाचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'छिछोरे' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धानं तिच्या आजाराचा खुलासा केला.
'छिछोरे'च्या यशानंतर पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखती दरम्यान श्रद्धा म्हणाली, मागच्या 6 वर्षांपासून मी Physical Anxiety ने आजारी आहे. मात्र याबद्दल मला या बद्दल सुरुवातीला काहीच माहित नव्हतं.
श्रद्धा सांगते, माझा पहिला सिनेमा 'आशिकी 2' नंतर या आजाराविषयी समजलं. माझं संपूर्ण शरीर दुखत असे. त्यामुळे अनेक टेस्ट केल्या डॉक्टर्स बदलले. मात्र कोणत्याही टेस्टमध्ये काहीही समस्या दिसून आली नाही.
त्यानंतर मला समजलं की मला Physical AAnxiety आहे. आजही मी या आजाराशी झगडते आहे. मात्र मी हे स्विकारलं आहे की मला हा आजार आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता मला खूप कमी त्रास होतो.
श्रद्धा सांगते, जेव्हा तुमच्यातली एखादी नकारात्मक गोष्टही सकारात्मक दृष्टीकोणतून स्वीकारता त्यावेळी त्याचा सामना करणं तुम्हाला सोपं जातं.
श्रद्धाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, तिचे 'साहो' आणि 'छिछोरे' हे दोन सिनेमे नुकतेच रिलीज झाले. याशिवाय लवकरच तिचा 'स्ट्रीट डान्सर 3D' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच ती 'बागी 3' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे.