

अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या ‘ड्रीम गर्ल’मुळे खूप चर्चेत आहे. या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.


आयुष्यमान खुराना नेहमीच त्याच्या अनोख्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्या या सिनेमाची आतुरतेन वाट पाहत होते.


ड्रीम गर्ल सिनेमाच्या राधे राधे या गाण्यावर धम्माल डान्स करणाऱ्या आयुष्यमानने Article 15 मध्येही जबरदस्त परफॉरमन्स दिला होता.


ड्रीम गर्लमध्ये आयुष्यमान आणि नुसरत भारुचा पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे गाणं ढगाला लागली कळ या लोकप्रिय मराठी गाण्याचं रिमिक्स आहे.


मराठी अभिनेता दादा कोंडके यांचं गाणं ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचं रिमिक्स आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल’ सिनेमात वापण्यात आलंय. आयुष्मान आणि अभिनेत्री नुसरत भारुचा यावर डान्स करताना दिसत आहेत.


आयुष्मानने यात स्त्रीपात्र निभावणाऱ्या अभिनेत्रीची भूमिका केली आहेत. त्यानंतर त्याच्यावर असा काही प्रसंग ओढवतो की त्याला पूजा म्हणून समांतर आयुष्य जगायला लागतं.


ही अभिनेत्री नव्हे, तर आयुष्मान खुरानाने वठवलेली पूजा ही सिनेमातली ड्रीम गर्ल आहे. आयुष्मानने वठवलेली ही स्त्रीभूमिका कशी जमली आहे हे पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागेल. पण सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी ड्रीम गर्ल पूजाला पूर्ण मार्क दिले आहेत.