• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पुढच्या वर्षी येणार राणू मंडलचा Biopic; ही अभिनेत्री साकारणार भूमिका तर हिमेश रेशमियालाही विचारणा

पुढच्या वर्षी येणार राणू मंडलचा Biopic; ही अभिनेत्री साकारणार भूमिका तर हिमेश रेशमियालाही विचारणा

राणूच्या या प्रसिद्धीनंतर आता तिच्यावर एक बायोपिक देखील बनवला जात आहे. मागील वर्षीच या चित्रपटाची घोषणा झाली होती.

 • Share this:
  मुंबई 4 सप्टेंबर : सोशल मीडिया (Social Media) असं साधन आहे, ज्याने रातोरात एखाद्या व्यक्तिचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. अनेक स्टार्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे रोड सिंगर राणू मंडल (Ranu Mondal). कोलकत्याच्या एका रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी राणू तिच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. इतकच नाही तर अनेक शोज मध्ये तिने हजेऱी लावली. तर तिला चित्रपटात गाण्याचीही संधी मिळाली. राणूच्या या प्रसिद्धीनंतर आता तिच्यावर एक बायोपिक देखील बनवला जात आहे. मागील वर्षीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. चित्रपटाची कहानी राणू मंडलच्या जीवनावर आधारीत असणार आहे. तिचा प्रवास त्यातून पाहायला मिंळेल. चित्रपटाचं नाव ‘मिस राणू मारिया’ असं आहे. त्याला ऋषिकेश मंडल दिग्दर्शित करत आहेत.

  सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी या अभिनेत्री-पोलिसांमध्ये जुंपली, Watch Video

  हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री इशिका डे (Eshika Dey) चित्रपटात राणूची भूमिका साकारणार आहे. इशिकाने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचं शुटींग मुंबई आणि दिल्लीत होणार आहे. तिने सांगितलं की, चित्रपटासाठी ती पहिली चॉइस नव्हती. सुरुवातीला सुदिपा चक्रवर्ती चित्रपटात दिसणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र लॉकडाउनदरम्यान तारखांचं शेड्युल बिघडलं असल्याने इशिकाला चित्रपटात घेण्यात आलं. इशिकाने सेक्रेड गेम्स, लाल कप्तान सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.

  सुशांतसह बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या संजना सांघीचा सुपरकुल लुक; मालदीवमध्ये करतेय b'day celebration

  इशिकाने पुढे सांगितलं की, ते हिमेश रेशमियाशी संपर्क साधत आहेत. पण अद्याप त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. तिने सांगितलं की, ती चित्रपटासाठी फारच उत्साही आहे. पण सगळ्यात आधी मला चित्रपटासाठी दोनच महिन्यात 10 किलो वजन कमी करावं लागणार आहे. दरम्यान हिमेश रेशमियाने सर्वात आधी राणू मंडलला गाण्याची संधी दिली होती. पुढच्या वर्षी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:News Digital
  First published: