अभिनेत्री संजना सांंघी सध्या तिचा वाढदिवस साजरा करत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. संजनाचा नुकताच वाढदिवस झाला. तर आता ती २५ वर्षांची झाली आहे. मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करत आहे. सुपरकूल लुकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत तिने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं होतं. दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला होता. संजना आणि त्याची केमिस्ट्री सुपरहीट ठरली होती. संजना तिच्या पहिल्याच चित्रपटातून हिट ठरली होती. त्याआधी संजनाने अनेक जाहीरातींत काम केलं होतं. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर संजना फार सक्रिय असते. साडीत संजना फारच आकर्षक दिसत आहे.