मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी या अभिनेत्री-पोलिसांमध्ये जुंपली, Watch Video

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी या अभिनेत्री-पोलिसांमध्ये जुंपली, Watch Video

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी त्याला निरोप देण्यासाठी आलेली त्याची मैत्रीण अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) आणि तिचा पती यांचं मुंबई पोलिसांशी चांगलीच तु तू मी मी झालं.

  • Published by:  News Digital

मुंबई 4 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काल मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. अनेक टीव्ही स्टार्स त्याला निरोप देण्यासाठी स्मशानभूमीवर पोहोचले होते. याशिवाय त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी त्याला निरोप देण्यासाठी आलेली त्याची मैत्रीण अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) आणि तिचा पती यांचं मुंबई पोलिसांशी चांगलीच तु तू मी मी झालं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात संभावना आणि पोलीस यांच्यातील धक्काबुक्की पाहायला मिळत आहे.

संभावनाचा पती अविनाशची पोलीसांनी कॉलर पकडली होती. आणि त्यानंतर ते दोघेही पोलिसांवर चांगलेच भडकलेले दिसले. पोलीस आणि संभावना यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळालं. स्मशान भूमीच्या गेटवर ही घटना पाहायला मिळाली. मुंबईतील ओशीवारा स्मशान भूमीत हिंदू (ब्रह्मकुमारी) रितीने सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sambhavna Seth Viral Video)

सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. प्रथमदर्शनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. आणखी तपासानंतर कारण स्पष्ट केलं जाणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla