जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राणी मुखर्जीनं नॅशनल टीव्हीवर केली होती करीनाची पोलखोल, करण जौहरही झाला होता शॉक

राणी मुखर्जीनं नॅशनल टीव्हीवर केली होती करीनाची पोलखोल, करण जौहरही झाला होता शॉक

राणी मुखर्जीनं नॅशनल टीव्हीवर केली होती करीनाची पोलखोल, करण जौहरही झाला होता शॉक

करीना आणि राणी मुखर्जी करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये आल्या होत्या. सध्या त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च- राणी मुखर्जी जरी सिनेमांपासून लांब असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या काय कमी नाही. आजही राणीची क्रेझ पाहायला मिळते. आता खूप वेळानंतर राणी पुन्हा कमबॅक करत आहे . लवकरच राणी मुखर्जी ‘मर्दानी 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातला घेऊन राणीचे चाहते उत्सुक आहेत. सध्या राणी मात्र तिच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सध्या राणी मुखर्जी आणि करीना कपूरचा एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. करीना आणि राणी मुखर्जी करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये आल्या होत्या. शोमध्ये दोघांनी खूप धमाल केली. यासोबतच दोघांची अनेक गुपितेही उघड झाली. दरम्यान, करणने राणीला असा प्रश्न विचारला की, ‘करीनाकडे असं काय आहे, जे तुझ्याकडे नाही’ - या प्रश्नाचे उत्तर राणी मुखर्जीनेही अशा अनोख्या पद्धतीने दिले. ज्यामुळे करीना कपूरचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मात्र, नंतर जेव्हा करीनाला विचारण्यात आले तेव्हा तिने राणी मुखर्जीची अनेक गुपितेही उघड केली. वाचा- प्रिया बापटच्या हातची पुरणपोळी खाल्यानंतर उमेश कामतनं दिली अशी काय प्रतिक्रिया.. करीना कपूर राणीचं उत्तर ऐकून झाली होती शॉक करीना आणि राणी आतापर्यंत करणच्या शोमध्ये गेस्ट म्हणून दोववेळा आल्या आहेत. दोघी देखील खूप धमाल करताना दिसल्या. करणने राणी मुखर्जीला विचारले की ती एक गोष्ट कोणती आहे जी तिच्याकडे आहे, पण करीनाकडे नाही? या प्रश्नावर राणीने काहीही विचार न करता लगेचच शाहिद कपूर असं सांगितले. राणी मुखर्जीचे उत्तर ऐकून करीना कपूर खान आश्चर्यचकित झालीच शिवाय करण जोहरही हैराण झाला होता. वाचा- होळीला उर्फीचा अजब अवतार; वाकडी वेणी पाहून नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स करीनानं देखील दिलं होत असं काही उत्तर करणने राणी मुखर्जीला विचारले होते की, ती एक गोष्ट कोणती आहे जी तिच्याकडे आहे, पण करीनाकडे नाही? हा प्रश्न ऐकून राणी काहीकाळ विचारात पडली होती. मात्र करीनानं जराही वेळ न घालवता, यश चोप्रा असं उत्तर दिल होतं. कारणही तसंत आहे, राणी नेहमी यशराज प्रोडक्शनच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसते.राणीनं यशराजच्या ‘वीर-जारा’, ‘हम-तुम’, ‘बंटी और बबली’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ आणि‘लागा चुनरी में दाग’ यासारख्या सिनेमात काम केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या राणी मुखर्जी तिच्या ‘मर्दानी 3’ या सिनेमामुळं चर्चेत आहे . ती शेवटची ‘बंटी और बबली 2’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात राणीसोबत सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमा पुर्णपणे फ्लॉप झाला. सध्या राणीचा आदित्य चोप्रासोबत सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांना आदिरा नावाची एक मुलगी देखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात