मुंबई, 7 मार्च- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. प्रिया-उमेश दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. या जोडीचे खूप फॅन फॉलोव्हर्स आहेत. बऱ्याचदा ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टला चाहत्यांची देखील पसंती मिळताना दिसते. प्रियानं नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे प्रियानं उमेशसाठी आईच्या टीप्स वापरून पोरणपोळी केली आहे. यावर उमेशनं अशी काही प्रतिक्रिया दिली आहे की, सगळीकडं त्याचीच चर्चा आहे. प्रिया बापटनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रियानं तिच्या आईनं दिलेल्या टीप्स वापरून पुरणपोळी केली आहे. पुरण कसा करायाच तसेच कसा वाटायचा नंतर त्यासाठी कणीक कशी मळायची व नंतर पोळी कशी लाटायची व भाजायची हे सगंळं तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. वाचा- ‘हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी आणि ओंकार रिलेशनशिपमध्ये; अभिनेत्रीने केला खुलासा प्रियाच्या हातची पुरणपोळी खाल्यानंतर उमेश म्हणताना दिसत आहे की, पुरणपोळी..माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि आता बायकोच्या हातची पुरणपोळी..वॉव. उमेश प्रसन्न होऊन सांगताना दिसत आहे. सध्या प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांसह सेलेब्सनी देखील यावर कमेंट केल्या आहेत.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.
उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला.याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, उमेशने लग्नासाठी फार वेळ घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते.अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले.